शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक फडे विक्रेत्यांवर संकट; स्वयंसेवी संस्थांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 19:12 IST

इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे.

ठळक मुद्देव्यवसाय बुडाला, परतीचे मार्गही बंद 

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिंदीच्या झाडांची काटेरी पाने तोडणे आणि त्यांचे सुबक अशी झाडू बनवून, ते विकून आपल्या संसाराचा गाडा हाकणे असे त्यांचे काम; मात्र इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे.सध्या यशोधरानगर पोलीस स्टेशनअंतर्गत एचसीजी कॅन्सर रुग्णालयाजवळ असे ६०-७० लोक वास्तव्यास आहेत. यांच्यासारखेच काही वाडी परिसरात ४०-५० लोक आहेत. मूळचे पारधी या शिकारी जमातीतील हे लोक आदिवासी म्हणून छत्तीसगडच्या बिलासपूर, जहांगीरचाफा, धनगाव या परिसरातील आहेत. यांच्यातील थोडा शिकलेला रवी मालिया या युवकाने आपबीती मांडली. शिंदीच्या झाडांच्या फांद्यापासून फडे तयार करून विकणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. ही शिंदीची पाने ओडिसावरून नागपूरला आणली जातात. साधारणत: दिवाळीनंतर ही सर्व मंडळी नागपूरला येतात. नागपूरप्रमाणे यवतमाळच्या वणी आणि चंद्रपूरच्या तळोधी बाळापूर या भागातही यांचे वास्तव्य असते. ओडिशावरून आलेल्या शिंदीच्या फांद्यांचे सुबक असे फडे तयार करणे आणि नंतर गावोगावी नेऊन विकणे, असे त्यांचे काम चालते. डिसेंबर ते मे-जूनपर्यंत त्यांचे हे काम चालते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते सर्व आपल्या मूळ गावाकडे परत जातात.यावर्षीही ते याच नियमानुसार नागपूर व इतर भागात पोहचले. त्यांनी फडे तयार करण्याचे कामही सुरू केले होते. मात्र आता ऐन विक्रीच्या वेळी कोरोनाचे संकट ओढवले. देशात आणि राज्यातही लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे त्यांचा व्यवसायच ठप्प पडला आहे. व्यापार करता येत नाही आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे या जमातीवर उपासमारीची पाळी आली आहे. जगण्याचा मोठा संघर्ष त्यांना करावा लागत आहे.स्वयंसेवी संस्थांचा आधारकाही स्वयंसेवी संस्थांचे लोक आशा संकटाच्या वेळी फडे विकणाºया या पारधी आदिवासी जमातीच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांची माहिती मिळताच संघर्षवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती पाहून त्यांच्या पुढ्यात धान्य दिले. इतरही तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस