शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:06 IST

नागपूर विभागात ६३४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत. रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत.

ठळक मुद्देगर्भवती माता अडचणीत : मेयो, मेडिकल, महापालिकेने करावी स्वतंत्र औषध खरेदी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत. नागपूर विभागात ६३४ रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत.असे असताना, प्रशासन मात्र या रोगाला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. विशेषत: मेयो, मेडिकल स्वाईन फ्लूवरील औषधांसाठी आरोग्य विभागावर अवलंबून आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या दोन्ही रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत. लसीकरण थांबल्याने कुण्या गर्भवतीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.उपराजधानीला स्वाईन फ्लूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. स्वाईन फ्लूने दगावलेल्या रुग्णांमध्ये गर्भवतींची संख्या १५ आहे. यामुळे गर्भवती मातांचे लसीकरण करण्यासंदर्भात सूचना असताना लसीकरणासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचे वास्तव आहे. आतापर्यंत मेडिकल, मेयो, डागासह नागपूर महापालिकेच्या रुग्णालयांना लस आणि औषधे पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेत होता, परंतु अलीकडे आरोग्य विभागानेही हात वर केले. संबधित रुग्णालयांनी स्वत:च्या आर्थिक अंदाजपत्रकातून खरेदीचे धोरण तयार करावे अशी चर्चा आरोग्य विभागात आहे.नागपूर शहरातील स्वाईन फ्लू बाधितांची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. गेल्या दहा महिन्यांत नागपूर शहरात ३०० स्वाईन फ्लू बाधित आढळले असून यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. तरीदेखील महापालिकेला स्वाईन फ्लू प्रतिबंधित लस खरेदीचे शहाणपण सुचले नाही. दरम्यान मंगळवार ५ डिसेंबर रोजी ‘आम आदमी पक्षा’तर्फे जम्मू आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना स्वाईन फ्लू लस उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी भेट घेतली. शिष्टमंडळात मनोज सोनी, रविकांत वाघ, अनिल शर्मा, आरिफ दोसनी, किरण ठाकरे, करण शाह, धीरज अढावू, आतिश तायवाडे, अरविंद वाघमारे, उमाकांत बनसोड यांचा समावेश होता.स्वाईन फ्लूबाधितांसाठी स्वतंत्र आयसीयू असावे‘आप’पक्षाच्या मागणीमध्ये स्वाईन फ्लू बाधितांसाठी स्वतंत्र आयसीयू असावे या मुख्य मागणीसह लसीकरणाची सोय , स्वाईन फ्लू तपासणी प्रयोगशाळा व औषधांचा तुटवडा दूर करण्याचीही मागणी निवेदनातून केली.

टॅग्स :medicineऔषधंnagpurनागपूर