सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक/ कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी तेरा तालुक्यात २,४६६ रुग्णांची नोंद झाली. २० रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत ६१,५१२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १२०६ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात शुक्रवारी १०७२ नागरिक कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ही संख्या आता ४२,९९६ इतकी झाली आहे. सध्या ग्रामीण भागात १६,७५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सावनेर तालुक्यात शुक्रवारी ४३३ रुग्णांची भर पडली तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १३९ तर ग्रामीण भागात २९४ रुग्णांची नोंद झाली. काटोल तालुक्यात ८१० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ११६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ७२ तर ग्रामीण भागातील ४४ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्यात ११२ रुग्णांची नोंद झाली. यात शहरात २८ तर ग्रामीण भागात आज ६४ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३४ तर शहरात १०६ इतकी झाली आहे. शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ३८, मेंढला (६), जलालखेडा (२४) तर मोवाड येथे १६ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात संक्रमणाचा वेग कायम आहे. येथे ११९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात ३४ तर ग्रामीण भागात ८५ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात तेलकामठी येथे १४, मोहपा (१२), तेलगाव (९), लिंगा, उबाळी प्रत्येकी ६, धापेवाडा, वाढोणा प्रत्येकी ४, तोंडाखैरी, खैरी हरजी प्रत्येकी ३, वरोडा, तिडंगी, तिष्टी बु, सावंगी तोमर, मांडवी, नांदीखेडा येथे प्रत्येकी दोन तर सिंदी, सावळी बु, भडांगी, लोणारा, साहुली, केतापार, घोराड, पारडी देशमुख, मोहगाव, तिष्टी खु, जुनेवानी, सोनुली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
मौदा तालुक्यात ११० रुग्णांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १५८० झाली आहे. यातील ९८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५५७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. उमरेड तालुक्यात ६४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.
कुही तालुक्यात ५५८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही शहरात १०, कुही ग्रामीण (११), मांढळ (२८), वेलतूर (४४), तितूर (४) तर साळवा येथे दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ११९ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ८ वॉर्डात १९ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागातील ४० गावात १०० रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २६०९ झाली आहे. यातील १५४० रुग्ण कोरोना मुक्त झाले. ५७ रुग्णांचा मृत्यू झाला.
कामठी तालुक्यात १५१ रुग्ण
कामठी तालुक्यात १५१ रुग्णांची भर पडली. यात कामठी शहरात ०९, कामठी कॅन्टोन्मेंट (७), गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (१२) , गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १२३ रुग्णांची नोंद झाली.