शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनावरील संकट टळले ! २३ कोटी रुपये देण्याचे आश्वासनानंतर ठेकेदारांनी घेतले आंदोलन मागे

By आनंद डेकाटे | Updated: November 22, 2025 19:24 IST

प्रधान सचिवांच्या आश्वासनानंतर ठेकेदार काम करण्यास तयार : सोमवारी आणखी २३ कोटी रूपये मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर निर्माण झालेले संकट शनिवारी दूर झाले. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मध्यस्ती करीत सोमवारी आणखी २३ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. रविवारीपासून अधिवेशनाच्या तयारीची कामे युद्धस्तरावर सुरू होणार आहेत.

८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी १ डिसेंबरची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये विधानमंडळ सचिवालय कार्यरत होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ९३.८४ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करून कामांना प्रारंभ केला होता.

मात्र, २०२४ च्या अधिवेशनातील सुमारे १५० कोटींच्या थकबाकीची मागणी करत ठेकेदारांनी या महिन्याच्या सुरुवातीला अधिवेशन तयारीच्या कामांचा बहिष्कार केला होता. काही रक्कम मिळाल्याच्या आश्वासनावर काम पुन्हा सुरू केले, परंतु गुरुवारी केवळ २० कोटी रुपये वितरित झाल्याने ठेकेदार नाराज झाले व शुक्रवारी पुन्हा कामबंद केले. दोन दिवस कामकाज ठप्प राहिल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

दरम्यान पीडब्ल्यूडीच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शनिवारी नागपुरात येऊन मध्यस्ती केली. त्यांना मुख्य अभियंता संभाजी माने व अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सोमवारी ठेकेदारांसाठी २३ कोटी रुपये अतिरिक्त देण्यात येतील. तसेच अधिवेशनापूर्वी थकबाकीची ५० टक्के रक्कम अदा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी ही माहिती नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांना दिली. आश्वासन स्वीकारत असोसिएशनने रविवारीपासून काम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. काही ठेकेदारांनी शनिवारीच काम सुरू केले.

युद्धस्तरावर काम करू 

ठेकेदारांनी आश्वासनाचा मान राखण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस कामबंद झाले असले तरी आता दिवस-रात्र युद्धस्तरावर काम केले जाईल. अधिवेशनापूर्वी थकबाकीची ५० टक्के रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.सुबोध सरोदे, अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन

ही कामे ठरली मोठी आव्हाने

- हैदराबाद हाऊसच्या बॅरेकचे छत उघडे पडले आहे. १ डिसेंबरपूर्वी ते दुरुस्त करून सुस्थितीत करणे आवश्यक.- रविभवनातील चार कॉटेजच्या छताचे काम सुरू असून येथे नवीन छत बांधले जात आहे.- विधान भवनात मंत्र्यांच्या दालनाचे काम अद्याप अपूर्ण आहे.- वन विभाग चौक ते बोर्ड ऑफिस चौक या दरम्यानचा सिमेंट रस्ता सुमारे ५० टक्के अपूर्ण आहे.

डेडलाइनपूर्वी काम पूर्ण करू 

१ डिसेंबरपूर्वी बहुतेक कामे पूर्ण होतील. बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असून ठेकेदार रविवारीपासून कामाला सुरुवात करतील. त्यामुळे डेडलाईनपूर्वीच काम पूर्ण करू.- जनार्दन भानुसे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Winter Session Crisis Averted: Contractors Resume Work After Assurance

Web Summary : Nagpur's winter session crisis is over. Contractors called off their strike after receiving assurance of ₹23 crore payment. Preparations resume for the session starting December 8. Key pending works include Hyderabad House repairs and road construction.
टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन