शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराजबागवरील संकट टळले : मान्यता रद्द करण्याच्या आदेशास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:40 IST

कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच याबाबत वारंवार ताकीद देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाराज बाग प्रशासनाने यासंदर्भात केंद्रीय वन, पर्यावरण विभागात दाद मागितली होती. त्यानुसार केंद्रीय वन, पर्यावरण विभागाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने दिलेल्या आदेशावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराज बागेवरील संकट तूर्तास टळले असून महाराज बाग प्रशासनाला सुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच याबाबत वारंवार ताकीद देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाराज बाग प्रशासनाने यासंदर्भात केंद्रीय वन, पर्यावरण विभागात दाद मागितली होती. त्यानुसार केंद्रीय वन, पर्यावरण विभागाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने दिलेल्या आदेशावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराज बागेवरील संकट तूर्तास टळले असून महाराज बाग प्रशासनाला सुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची स्थापना १८९४ मध्ये झाली. महाराज बागची जबाबदारी डॉ पंजाबवराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे सोपवली. कृषी महाविद्यालयाकडे महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन होते. मात्र महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील पिंजरे, प्राण्यांची व्यवस्था आणि इतर सर्व बाबींची पूर्तता करण्यात महाराज बाग व्यवस्थापन असमर्थ ठरत असल्याचा ठपका ठेवत या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने घेतला. परंतू केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने घेतलेला निर्णय अयोग्य असून महाराज बाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापन पुरेपूर आपली जबाबदारी सांभाळत आहे. उलट या प्राणिसंग्रहालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर समस्यांसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडे महाराज प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दाद मागितली. परंतु यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे मत केंद्रीय वन, पर्यावरण विभागाकडे महाराज बाग प्रशासनाने मांडले. याबाबत दोन्ही विभागाचे म्हणणे ऐकून केंद्रीय वने, पर्यावरण विभागाने केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या आदेशावर तूर्तास स्थगिती दिली आहे. तर केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने सुचविलेल्या अटींची पूर्तता करण्यावर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा भर राहणार असल्याची माहिती महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर