शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे संकट विदर्भातील शेतकऱ्यांच्या दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:27 IST

शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देप्रादुर्भाव होण्यापूर्वी सतर्कता बाळगाकृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिनिंग मिल्समध्ये लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यात गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडीचा कपाशीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.नागपूर विभागात खरीप हंगामात ११.६६ लक्ष हेक्टरवर विविध पिकांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत विभागात सरासरी ६१ टक्के पेरणी झाली असून वर्धा जिल्ह्यात ८७ टक्के, नागपूर ७६, चंद्रपूर ६५, गडचिरोली ३०, गोंदिया २३ तसेच भंडारा जिल्ह्यात २२ टक्के पेरणी झालेली आहे. खरीप हंगामादरम्यान नागपूर विभागात ६.१८ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. गेल्यावेळी गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते. कीड व्यवस्थापनाचा खर्च वाढून उत्पन्नात मोठी घट झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही तशीच चिन्हे आहेत. शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीच्या पाते, कळ्या, फुलांवर हे कीटक उपजीविका करतात. याशिवाय अळी बोंडातील बिया खाल्लाने रुईची प्रत तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या किडीचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत लक्षात येणे कठीण असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.फवारणी करताना काळजी घ्याकीटकनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बूट, मोजे, मास्क इत्यादी वापरावे. हवेच्या दिशेने फवारणी करावी व फवारणी शक्यतोवर सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेत करावी. कीटकनाशकाचा शरीराशी थेट संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी, चुकून संपर्क झाल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे. फवारणी द्रावण बनविताना परिसरात खाण्याचे पदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये. फवारणीच्या वेळी खाद्यपदार्थ, बिडी, तंबाखूचे सेवन टाळावे, फवारणीनंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

टॅग्स :cottonकापूस