शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:26 IST

स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था करण्यात मनपाला अपयश : महिनाभर सेवा कायम ठेवण्याचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार शहाराचे क्षेत्रफळ वाढण्यासोबतच लोकसंख्या वाढली आहे. याचा विचार करता कचरा संकलनासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कनकचे काम समाधानकारक नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही. यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका माघारण्याची शक्यता आहे.२००८ मध्ये कनक रिसोर्सेसला दहा वर्षासाठी घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. दहा वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतरही यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने कचरा संकलन संकटात येण्याची शक्यता आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. प्रति मेट्रिक टन १३०६ रुपये दराने कनकला मोबदला दिला जातो. अधिक बिल दिल्याने महापालिकेने कनकच्या बिलातून कपात केली आहे.कनकच्या सूत्रानुसार महापालिका प्रशासनाने घराघरातून कचरा संकलन करण्याला एक महिना मुदतवाढ दिली आहे. तूर्त कंपनीने आपला निर्णय दिलेला नाही. या संदर्भात आयुक्तांसोबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.नवीन फॉर्म्युल्यावर निर्णय नाहीघनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘रिक्वेस्ट टू प्रपोजल’(आरएफपी)तयार करून ते मुंबई बेस्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे पाठविण्यात आले आहे. तेच आरएफपीची सक्षमता व अन्य बाजूंचा विचार करून याचे मायक्रो नियोजन करणार आहे. परंतु निर्णय होऊ शकला नाही. शहरातील लोकसंख्या वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन करण्यात महापालिका कमी पडली आहे. यामुळे दोन ऑपरेटरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.कचरा संकलनाच्या खर्चात वाढलोकसंख्या वाढीसोबतच शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवर्षी कचरा संकलनावरील खर्चात वाढ होत आहे. घराघरातून कचरा संकलनाच्या मोबदल्यात महापालिकेने वर्ष २०१५-१६ मध्ये ४० कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ४४.२४ कोटी, वर्ष २०१७-१८ मध्ये ५७.९५ कोटी व वर्ष २०१८-१९मध्ये जानेवारीपर्यंत ४४.६४ कोटी खर्च केले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न