शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची माहिती तात्काळ मिळणार

By admin | Updated: September 15, 2015 06:21 IST

गुन्हेगारांची माहिती तक्रारकर्त्यांना इंटरनेटवर पाहण्याची आणि प्रत्येक पोलीस ठाणेदारांना आवश्यकतेनुसार संबंधित

 नागपूर : गुन्हेगारांची माहिती तक्रारकर्त्यांना इंटरनेटवर पाहण्याची आणि प्रत्येक पोलीस ठाणेदारांना आवश्यकतेनुसार संबंधित गुन्ह्याची माहिती होण्यासाठी सीसीटीएनएस अर्थात ‘क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अ‍ॅण्ड सिस्टिम्स् ’ ही नवी अत्याधुनिक प्रणाली पोलीस विभागाने विकसित केली आहे. या प्रणालीचा लोकार्पण सोहळा १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. पर्सिस्टंट सिस्टिम्स् आॅडिटोरियम आयटी पार्क नागपूर येथे हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंह हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या हेतूने ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एखाद्या गुन्ह्याच्यासंबंधी तक्रारकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या गुन्ह्याची अद्ययावत माहिती रोजच्या रोज संबंधित तक्रारकर्त्याला इंटरनेटवर या प्रणालीद्वारे मिळू शकेल. त्या तक्रारकर्त्याला ‘एफआयआर’च्या प्रतीबरोबर या संबंधीचा युजर अ‍ॅण्ड पासवर्ड दिला जाईल. म्हणजे पोलिसांकडून होत असलेली तपासाबाबतची प्रगती त्याला इंटरनेटवर मिळू शकेल. त्याशिवाय एखादा गुन्हेगार दुसऱ्या जिल्ह्यात सापडला असेल तर संबंधित ठाणेदाराला त्या गुन्हेगारांची माहिती तातडीने इंटरनेटवर मिळू शकेल. प्रत्येक ठाणेदाराला युजर अ‍ॅण्ड पासवर्ड देण्यात येईल. या नव्या प्रणालीचा उपयोग राज्यातील १ हजार ५० पोलीस ठाण्याला होईल. याप्रसंगी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, महापौर प्रवीण दटके, खासदार विजय दर्डा, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने,आ. राजेंद्र मुळक, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. सुनील केदार, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)