शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात लाठ्याकाठ्या, लाेखंडी राॅड व हत्यारांसह गुन्हेगारांचा दीड तास धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 10:42 IST

लाठ्याकाठ्या, लाेखंडी राॅड व हत्यारांसह असलेल्या गुन्हेगारांनी मंगळवारी रात्री नागपूर शहरात दीड तास धुमाकूळ घातला. त्यांचा हा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ठळक मुद्दे हे सर्व तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या आधारावर पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. मात्र हे प्रकरण संवेदनशील ठरणारे आहे.

 

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाठ्याकाठ्या, लाेखंडी राॅड व हत्यारांसह असलेल्या गुन्हेगारांनी मंगळवारी रात्री शहरात दीड तास धुमाकूळ घातला. त्यांचा हा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शहरात कडेकाेट सुरक्षा बंदाेबस्त असल्याच्या पाेलिसांच्या दाव्याची सत्यता उघड झाली आहे.

माहितीनुसार रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान १२ ते १५ माेटरसायकलवर स्वार असलेल्या असामाजिक तत्वांनी शांतिनगरकडे कूच केले. बहुतेक तरुणांजवळ लाठ्या व राॅड हाेते तर काहींनी तलवारीही लपविल्याचे सांगण्यात येत आहे. शांतिनगरमधून निघून दहीबाजाराकडे हे तरुण पाेहचले. पुढे मारवाडी चाैक, बंगाली पंजा परिसरात धुमाकूळ घातला. वेगाने बाईक चालविणारे हे तरुण कुणालातरी शाेधत हाेते. प्रकाश पानटपरीजवळ पाेलीस उभे असल्याचे पाहून ते वेगवेगळ्या दिशेने वळले व पुढे वळण घेत राऊत चाैकात पाेहचले. येथून मस्कासाथ आणि दहीबाजार पुलाकडून ते पुन्हा शांतिनगरकडे परत आले.

यादरम्यान घटनेची माहिती लक्षात येताच पाेलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. हे तरुण पाचपावली येथील शुभम नामक युवकावर हल्ला करण्याच्या उद्देशाने धुमाकूळ घालत असल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. पाेलिसांनी त्या भागात जाऊन चाैकशी केली असता हे तरुण येऊन गेल्याची माहिती मिळाली. दीड तास चाललेला हा धुडगूस पाहून पाेलिसांचीही दमछाक झाली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून या असामाजिक तत्वांचा शाेध घेतला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे शहरात लाॅकडाऊन सुरू असून पाेलीस रस्त्यावर तैनात आहेत. असे असताना असामाजिक तत्वांचा हा धुडगूस चिंता वाढविणारा ठरला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी