शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत विविध प्रांतांतील गुन्हेगारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:38 IST

नागपुरात अलीकडे विविध प्रांतांतील कुख्यात गुन्हेगार डेरेदाखल होऊन गुन्हे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देमुक्कामी राहून करतात गुन्हे महिनाभरात तीन टोळ्या जेरबंद

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहे. देश-विदेशात कोणत्याही ठिकाणावर जाण्यासाठी येथून पाण्यातील जहाज वगळता दळणवळणाची विविध साधनं उपलब्ध आहेत. रोजगाराचीही संधी चांगली आहे. त्यामुळे विविध प्रांतांतील मंडळी नागपूरकडे धाव घेताना दिसते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील कष्टकरी मंडळींचे लोंढे नेहमीच नागपुरात यायचे. नंतर ओडिशा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधील मंडळीही रोजगारासाठी येऊ लागली. त्यांच्यापाठोपाठ ओडिशा, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि आंध्रातील गांजा तस्करांच्या येरझारा वाढल्या. अलीकडच्या काही वर्षांत एमडी हा सर्वात महागडा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या नागपूरला खेपा वाढल्या आहेत. हे कमी की काय म्हणून नागपुरात अलीकडे विविध प्रांतांतील कुख्यात गुन्हेगार डेरेदाखल होऊन गुन्हे करीत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.प्रारंभी येथे फसवणूक करणाऱ्या दाक्षिणात्य अण्णा टोळींचे वास्तव्य राहायचे. विशिष्ट दिवस मुक्कामी राहून ही टोळी गुन्हे करायची अन् येथून पळून जायची. आता मात्र मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार नागपुरात राहून, येथे आपली टोळी बोलवून गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिनाभरात गुन्हे शाखेने अशाच प्रकारे नागपुरात राहून गुन्हे करणाऱ्या आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील सिसोदिया टोळीचा छडा लावला. त्यातील तीन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांसह ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तामिळनाडूतील चेन्नईचा मुरली परशुरामन हा कुख्यात गुन्हेगार नागपुरात तीन वर्षांपासून मुक्कामी होता. तो ऑटो चालवून शहरात फिरायचा. संधी मिळताच दुचाकी चोरायचा अन् चेनस्नॅचिंगचे गुन्हे करायचा. अलीकडे त्याने वेल्लोर (चेन्नई) येथील आपल्या साथीदारांना नागपुरात बोलवून महिलांचे दागिने लुटण्याचा सपाटा लावला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी