शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएनए’मुळे शोधता येतो गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:38 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणावरील निर्णयामध्ये ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाने सांगितले महत्त्व तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणावरील निर्णयामध्ये ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले. डीएनए आधुनिक तंत्रज्ञान असून ते तपास यंत्रणा व न्यायालय यांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा अत्यंत काळजीपूर्वक उपयोग करणे आवश्यक आहे. त्यात थोडीही चूक झाल्यास गुन्हेगार संशयाचा लाभ मिळून मोकळा सुटू शकतो असे न्यायालय म्हणाले.या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग करताना योग्य काळजी घेतली नाही. ‘डीएनए’साठी रक्ताचे नमुने काढणाऱ्या डॉक्टरला न्यायालयात तपासण्यात आले नाही व या प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला नाही. तसेच, केमिकल अ‍ॅनालायजर्सलाही तपासण्यात आले नाही. परिणामी, संशय निर्माण झाला व त्याचा लाभ आरोपीला मिळाला. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने ‘डीएनए’चे महत्त्व समजावून सांगितले.१९ जुलै २०१८ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने नागेश सामय्या माडे (२४) या आरोपीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी दोषी ठरवून १० वर्षे कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावताना विविध पुराव्यांसह ‘डीएनए’ अहवालाचा आधार घेण्यात आला होता. आरोपीने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबींमुळे ‘डीएनए’ अहवाल संशयास्पद ठरवून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. आरोपी वियामपल्ली, ता. सिरोंचा येथील रहिवासी असून ही घटना २९ एप्रिल २०१६ रोजी घडली होती. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय