शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सर जो उठेगा धड से कटेगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:48 IST

हिंदी चित्रपट ‘रक्तचरित्र’मधील ‘सर जो उठेगा धड से कटेगा, गांव से छिपेगा कहाँ से बचेगा’ या गाण्याला शहरातील एका गुन्हेगाराने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले आहे. अनेक लोक त्याच्या दहशतीत आहेत आणि बळीही ठरले आहेत.

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदी चित्रपट ‘रक्तचरित्र’मधील ‘सर जो उठेगा धड से कटेगा, गांव से छिपेगा कहाँ से बचेगा’ या गाण्याला शहरातील एका गुन्हेगाराने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले आहे. अनेक लोक त्याच्या दहशतीत आहेत आणि बळीही ठरले आहेत. प्रतिष्ठेपोटी पीडित नागरिक पुढे आले नाही आणि जे समोर आले त्यांनाही शांत केले गेले. परंतु, पोलिसांच्या गुन्हे शाखेची वक्रदृष्टी पडताच त्या गुन्हेगाराचा काळ वक्री झाला असून, तो कुख्यात गुन्हेगार रोशन शेख तुरुंगात बंद झाला आहे.दुकानावर कब्जा करण्यासाठी अपहरण करून जिवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणात क्राईम ब्रँचने रोशन शेखला अटक केली आहे. या प्रकरणात कुख्यात अंकित पाली, अभिषेक सिंहसोबतच सात आरोपी सामील आहेत. या गँगच्या दुष्कृत्याला बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. पीडितांची क्लिपिंग बनवून ती व्हायरल करायची. त्यामुळे, पीडित घाबरून त्यांच्या हातचे खेळणे बनतो. अशा प्रकारच्या अनेक क्लिपिंग पुढे आल्या आहेत. या क्लिपिंगमध्ये संबंधित गुन्हेगार महिलांसोबत अय्याशी करण्यासोबतच, त्यांना बाधा पोहोचवणाऱ्यांची धुलाई करतानाचे चित्रिकरण आहे. एका क्लिपिंगमध्ये तर कायदा धाब्यावर बसवून गुन्हेगार पिस्तुल हातात घेऊन कार चालवत आहे. ‘रक्तचरित्र’मधील गाण्यावर ही क्लिपिंग बनविण्यात आली आहे. या क्लिपिंगची दखल घेण्याची भीती असल्यामुळे ती पिस्तुल नसून लायटर असल्याचेही सांगितले जात आहे.खरे सांगायचे तर क्लिपिंग बनवून व्हायरल करण्याची ही नीती प्लॅनिंगचाच एक भाग आहे. याच धर्तीवर कुख्यात संतोष आंबेकर काम करत होता. आंबेकर स्वस्त सोने किंवा जमीन मिळवून देण्याचा तसेच नोट एक्सचेंज रॅकेट चालवत होता. पीडित व्यक्तीला आंबेकर स्वत:च्या गुन्हेगारीची माहिती देणाºया युट्यूब व सोशल मीडियावरील बातम्या दाखवून पीडिताला धमकावत असे. याच दहशतीमुळे आंबेकर विरोधात पोलिसात तक्रार करण्यास कुणी धजावत नव्हता. याच प्रकारे रोशन शेखही काम करत होता.गुन्हेगारांची कंबर मोडू - सीपीपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लॉकडाऊनची जबाबदारी निभावतानाच गुन्हेगारांची कंबर मोडण्याचे काम पोलीस करत असल्याचे सांगितले. गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. पीडित महिला पुढे आल्यास त्याना संरक्षण दिले जाईल आणि त्यांची ओळखही लपवून ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी