शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:16 IST

निवडणुकीच्या कामातून वगळण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कारणे सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन संतापले असून निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. सूत्रानुसार जे कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रासाठी १९ हजार २७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नकार देणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिलेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या कामातून वगळण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कारणे सांगू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन संतापले असून निवडणूक कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. सूत्रानुसार जे कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारतील त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रासाठी १९ हजार २७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नकार देणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिलेत.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ४ हजार ३८२ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी यांची निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रँडमायझेशन पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहेत. त्यामुळे निवड झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या आहेत.केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत रँडमायझेशन पद्धतीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रथम अधिकारी, द्वितीय अधिकारी व कर्मचारी अशा पोलिंग पार्टीचे गठन करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती आदेश मिळाले आहेत, त्यांनी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात हजर होऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ४ हजार ८२ पीआरओ, ४ हजार ८२७ एफपीओ तसेच ओपीओमध्ये ४ हजार ८२८ पुरुष तर ४ हजार ७९२ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय