शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिलेंडर धारकांनी केरोसिनचा लाभ घेतल्यास फौजदारी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:50 IST

एकाच कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी शासनाच्या अनुदानित के रोसीन योजनेचा लाभ घेतल्यास संबंधित शिधापत्रिका धारकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार शिक्षेची तरतूद आहे. अशा आशयायाचे परिपत्रक शासनाच्या पुरवठा विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देशासन परिपत्रकाने रिटेलर्स अडचणीत : शपथपत्र घेतल्यानंतरच होणार करोसिनचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी शासनाच्या अनुदानित के रोसीन योजनेचा लाभ घेतल्यास संबंधित शिधापत्रिका धारकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार शिक्षेची तरतूद आहे. अशा आशयायाचे परिपत्रक शासनाच्या पुरवठा विभागाने काढले आहे.गॅस सिलेंडर नसलेल्या कुटुंबांना अनुदानित केरोसिन योजनेचा लाभ मिळतो. नागपूर शहरातील ४ लाख ५० हजार कुटुंबांकडे गॅस सिलेंडर नाही. त्यांना दर महिन्याला प्रत्येकी ६ लिटर केरोसिन प्रति लिटर २७.७३ रुपये अशा सवलतीच्या दराने उपलब्ध केले जाते. परंतु आता सवलतीचा लाभ घेणाºया सर्वांना शपथपत्र द्यावयाचे आहे. त्याशिवाय यापुढे केरोसीनचा पुरवठा होणार नाही.नागपूर शहरातील ६५० परवानाधारक केरोसिन हॉकर्स, रिटेलर्स असून वर्षानुवर्ष ते हा व्यवसाय करतात. मागील काही वर्षापासून केरोसिन पुरवठ्यावर शासनाने वेळोवेळी विविध स्वरुपाचे निर्बंध घातले आहेत. केरोसिनचा कोटा कमी करण्यात आला आहे. तसेच पूर्वी एक सिलेंडर असलेल्यांना केरोसिन मिळत होते. त्यांना वाटप बंद केले आहे. यामुळे केरोसिन योजनेच्या लाभार्थींची संख्या घटली आहे. हॉकर्सला एका लिटरमागे २३ पैसे कमिशन मिळते. ग्राहकांची संख्या कमी असल्याने हॉकर्सला फारशी रक्कम वाचत नाही.एक सिलेंडर असणारे अडचणीतएक गॅस सिलेंडर असलेल्या कुटुंबांना आधी महिन्याला तीन लिटर केरोसिन मिळत होते. परंतु ही सुविधा बंद केली आहे. गॅस संपल्यानंतर एजन्सीकडे गॅसची नोंदणी केल्यानंतर लगेच सिलेंडर मिळत नाही. तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे एक सिलेंडर असलेल्या कु टुंबीयांना अडचणीला सामोरे जावे लागते.मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणारआधिक केरोसिनचा कोटा घटला आहे. त्यात शासनाने शपथपत्राशिवाय केरोसिनचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केरोसीन हॉकर्स, रिटेलर्स अडचणी आले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र केरोसिन हॉकर्स, रिटेलर्स असोसिएशनचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील व उपाध्यक्ष दिलीप गत, प्रदीप उमरकर, दिनेश तानवे व संजय शाहू आदींनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcivic issueनागरी समस्या