शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कुणबी जातीलाही नको क्रिमीलेअरची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:48 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने २०१४ ला शासनाकडे अहवाल सादर केला. या राज्यातील ओबीसींच्या १०३ जातींना क्रिमीलेअरच्या अटीतून वगळण्याची शिफारस केली.

ठळक मुद्देमराठा सेवा संघ, संभाजी व जिजाऊ ब्रिगेडसह कुणबी संघटनांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मागासवर्ग आयोगाने २०१४ ला शासनाकडे अहवाल सादर केला. या राज्यातील ओबीसींच्या १०३ जातींना क्रिमीलेअरच्या अटीतून वगळण्याची शिफारस केली. या १०३ जातींमध्ये कुणबी जातीचाही उल्लेख आहे. सरकार अहवालातील शिफारशी मान्य करण्यास विचाराधीन असून, शासनाने या शिफारशी रद्द कराव्यात व क्रिमीलेअरची अट कुणबी जातीला लावू नये, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडसह विविध कुणबी संघटनांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन देऊन केली.सोमवारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या नावे निवेदन दिले. कुणबी समाज महाराष्ट्रात पूर्वीपासून शेतीशी जुळलेला आहे. त्यामुळे समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. शेती आणि शेतमजुरी हा पूर्वेपार चालत आलेला कुणबी समाजाचा ूव्यवसाय आहे. कोणत्याही संदर्भाने महाराष्ट्रातील कुणबी समाज संपन्न किंवा वैभवशाली नाही. त्यामुळे मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी जात समूहासह इतर सर्व जातीसमूहाला क्रिमीलेअर अट शिथिल करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. सरकार ओबीसींच्या बाबतीत फूट पाडीचे धोरण अवलंबित असेल तर, रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला.यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आ. परिणय फुके, कुणबी समाज संघटनेचे सुरे्श गुडधे पाटील, पुरुषोत्तम शहाणे, सुरेश कोंगे, बाबा तुमसरे, पंकड पांडे, शरद वानखेडे, दादाराव डोंगरे, अवंतिका लेकुरवाळे,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष जयाताई देशमुख, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले, महानगर अध्यक्ष अनिता ठेंगरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप खोडके, नंदा देशमुख, अरुण डहाके, सीमा टालाटुले, सुनीता जिचकार, सुषमा साबळे, स्वाती शेंडे, अमोल वाकुडकर, अभिजित दळवी, देवाजी मोहोड, पंकज निंबाळकर, मनीष येवले, श्याम डहाके आदींनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.