शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

उपराजधानीत गुन्हेगारी उफाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

२४ तासांत हत्येच्या दोन घटना, तर तिघांवर प्राणघातक हल्ला - नंदनवनमध्ये पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न - हुडकेश्वरमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला ...

२४ तासांत हत्येच्या दोन घटना, तर तिघांवर प्राणघातक हल्ला

- नंदनवनमध्ये पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न

- हुडकेश्वरमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत अवघ्या २४ तासांत दोन हत्या आणि पोलिसासह तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे गुन्हेगारी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज शुक्रवारी एकाच दिवशी हत्येच्या दोन थरारक घटना घडल्या. सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाची त्याच्या प्रतिस्पर्धी गुंडांनी हत्या केली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच एमआयडीसीत एसआरपीएफच्या एका निवृत्त कर्मचारी महिलेचीही हत्या झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, एमआयडीसीत गुरुवारी पहाटे एका तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाला. गुरुवारी सायंकाळी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला, तर शुक्रवारी सकाळी नंदनवनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही एका गुंडाने घातक शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या रक्तरंजित घटनांमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

एमआयडीसी

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पच्या मागे सप्तकनगर आहे. येथे विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) राहत होत्या. विजयाबाई एसआरपीएफच्या मेसमध्ये कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्या स्वतःच्या घरात सप्तकनगरात राहायला गेल्या. त्यांचा मुलगा अमोल एसआरपीएफमध्ये सेवारत असून, तो वेगळा राहतो. त्यांना दोन विवाहित मुलीसुद्धा आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास मोलकरीण त्यांच्याकडे कामाला गेली असता विजयाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती कळताच ठाणेदार युवराज हांडे, तसेच एमआयडीसी पोलीसचा ताफा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी पोहोचले. एकट्या राहणाऱ्या वृद्ध विजयाबाई यांची हत्या कोणी आणि का केली असावी, ते वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. मात्र, लुटमारीच्या उद्देशानेच ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवीत आहेत

रात्री उशिरा ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक बोलावून घेतले. श्वान आजूबाजूच्या भागात घुटमळले. त्यातून पोलिसांच्या हाती ठोस असे काही मिळाले नाही.

--

कोतवाली

ही घटना उघड होण्यापूर्वी

जुन्या वैमनस्यातून गुंडाच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानू ऊर्फ शहानवाज नासीर खान याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली.

शानू हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध कारवाईदेखील केली होती. त्याला महिनाभरापूर्वी तडीपारही करण्यात आले होते.

तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटेवर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानूचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर, ईद साजरी करण्यासाठी शानू घरी परतला. तो आज सकाळी दुचाकीने जात असताना दिसताच त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील राजा ऊर्फ अर्शद शेख याने पाठलाग करून त्याला गांधी गेटजवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली.

ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही तेथे भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला.

याप्रकरणी आरोपी सौरभ घाटे आणि अर्शद आणि मुख्य सूत्रधार प्रवीण घाटे या तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

---

पोलिसावर हल्ला

या घटनेपूर्वी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्सा मशीदजवळ पोलीस हवालदार सुनील पांडुरंग शिंदे हे आज सकाळी ९ वाजता कर्तव्य बजावत होते. तेथे आरोपी शेख रशीद शेख नजीर (४०) पोहोचला. त्याने हवालदार शिंदे यांच्या समोर येऊन त्यांना ‘तू येथून निघून जा. आमच्या लोकांना नमाज पडायची आहे. तू लवकर नीघ, नाही तर तुला जिवे ठार मारेन’, असे म्हणून वाद घातला. त्यानंतर धारदार शस्त्र काढून हवालदार शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. शिंदे यांच्या गळ्यावर आरोपीने वार केला. तो शिंदे यांनी हुकवला. नंतर हाताला, नाकाला आणि दंडावर घात बसल्याने ते जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्ते धावले. त्यांनी आरोपी शेख रशीदला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला नंदनवन पोलिसांनी अटक केली.

--

हुडकेश्वर

जयहिंदनगर येथे ऋषिकेश आणि त्याचा भाऊ अमित मनोज पाटील राहतात. हे दोघे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पांडव कॉलेज ग्राउंडवर आले असताना तेथे आरोपी रोहित विजय तिडके (२०) याने त्यांच्याशी वाद घातला, तसेच धारदार शस्त्राने ऋषिकेशच्या पोटावर मारून त्याला गंभीर जखमी केले. अमित पाटीलच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी तिडकेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

या सर्व घटनांपूर्वी एमआयडीसीत गुरुवारी पहाटे सम्राट विजय सिंग नामक तरुणाचा गळा धारदार शस्त्राने कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत, हे विशेष!

---