शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील राज डोरलेच्या हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:28 IST

भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.

ठळक मुद्देहोऊ शकतो सुपारी किलरचा पर्दाफाश : आरोपींची १२ पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.१ जूनच्या रात्री महाल परिसरातील भूतेश्वरनगर येथे २८ वर्षीय राज डोरले याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मुकेश नारनवरे व अंकित चतूरकर या आरोपींना अटक केली होती. अटकेतील आरोपी मुकेशने सांगितले की राज त्याच्यावर हल्ला करणार होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. त्याने या हत्याकांडात इतर कुणाचाही हात नसल्याचे सांगितले. लोकमतने या प्रकरणात सुपारी देऊन हत्या केल्याचा खुलासा केला होता. पोलिसांनी वृत्ताची दखल घेत, चौकशी करून आशिष वाजूरकर याच्याकडून हत्येची सुपारी दिल्याचा खुलासा केला. पोलिसांनी आशिषसोबत त्याचा मित्र रुपेश मेश्राम व आकाश मेश्राम यालाही अटक केली. राजकीय विरोधासोबतच पैशासाठी राजची हत्या केल्याची चर्चाही होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास गुन्हेशाखेच्या युनिट ३ ला सोपविण्यात आला. गुन्हेशाखेचे अधिकारी विनोद चौधरी यांनी मंगळवारी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.सूत्रांच्या मते राज सट्टेबाजी करीत होता. तो सामाजिक कार्यातही लाखो रुपये खर्च करीत होता. राज महापालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत होता. हत्येचा सूत्रधार आशिषसुद्धा राजकारणात सक्रिय आहे. त्याला राज विरोधक भासत होता. राजचेसुद्धा काही लोकांवर २ कोटी रुपये थकीत होते. राजकडून वारंवार मागणी होत असल्याने ते चिंतेत होते. आशिषचे म्हणणे आहे की तो राजच्या टार्गेटवर होता. त्याला अनेकांने सांगितले होते. त्याच कारणाने त्याची हत्या करण्यात आली. सूत्रांच्या मते राजकीय वाद व पैशाच्या वादातून हत्या केली जाऊ शकते. त्यामुळे आशिषने योजना आखून त्याची हत्या केली. राजच्या हत्येमुळे भाजप नेत्यांमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. त्यांना राजच्या हत्येमागे मोठा कट दिसून येत आहे. मात्र गुन्हेशाखेच्या चौकशीत आशिषने राजकीय वाद अथवा पैशाच्या वादामुळे हत्या केली नसल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून