शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

सरसंघचालकांची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा

By admin | Updated: December 23, 2015 03:47 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमातील विधानाचा विपर्यास करून बदनामीचा प्रयत्न...

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमातील विधानाचा विपर्यास करून बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत एका वेब पोर्टल व मजकूर छापणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात नागपुरात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या वेब पोर्टलवरील वादातीत मजकूर अद्याप हटविण्यात आला नसल्याचे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.‘इंडिया डॉट कॉम’ असे वेब पोर्टलचे नाव असून या पोर्टलवर १६ डिसेंबर रोजी सरसंघचालकांच्या विधानाबाबतचा मजकूर छापण्यात आल्याचे भेंडे यांनी सांगितले. संजय भेंडे यांनी २० डिसेंबर रोजी प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे या पोर्टलचे वार्ताहर मोहम्मद अझर शेख, संचालक देबाशिष घोष आणि पोर्टलच्या मुख्य संपादकाविरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही लोकांवर कलम १५३(अ) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय भेंडे यांनी सांगितले की, १६ डिसेंबरला नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या कार्यक्रमात सामाजिक समरसता या विषयावर बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समर्थन करीत ‘जातीभेदाचे समूळ निर्मूलन होईपर्यंत आरक्षण कायम ठेवणे गरजेचे आहे’ असे वक्तव्य केले होते. मात्र संबंधित वेब पोर्टलवर डॉ. भागवत यांनी ‘आरक्षणामुळे जातीय तेढ वाढले आहे’ असे विधान केल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक दिवसभर नागपुरात असताना हे वक्तव्य इंदूरमधील एका कार्यक्रमाचे असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जातीय तेढ निर्माण करीत सरसंघचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भेंडे यांनी केला. याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वेब पोर्टलवर बंदी घालून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र दोन दिवस लोटूनही इंडिया डॉट कॉमवरील वादग्रस्त मजकूर अद्याप कायम असल्याचा संताप संजय भेंडे यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबत आम्ही सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगत त्यांनी चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे भेंडे यांनी स्पष्ट केले. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची रूपरेषा आखण्यात येईल, असा इशारा भेंडे यांनी यावेळी दिला.