शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रिक्सच्या संचालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Updated: July 19, 2015 03:04 IST

कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा संचालक सुचित कुमार रामटेके ...

अनेकांची फसवणूक : कोट्यवधी हडपले नागपूर : कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा संचालक सुचित कुमार रामटेके आणि त्याच्या ११ साथीदारांवर धंतोली पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रामटेकेने वानाडोंगरी परिसरात रॉयल रेसिडेन्सी ही बहुमजली फ्लॅट स्कीम उभारण्याची पाच वर्षांपूर्वी जाहिरातबाजी केली होती. अल्प किमतीत स्वप्नातील घर मिळत असल्याचे सांगितले गेल्यामुळे रामटेके आणि त्याच्या साथीदारांच्या आमिषाला शेकडो नागरिक बळी पडले. कुणी तीन लाख तर कुणी त्यापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडे अ‍ॅडव्हान्स म्हणून दिली. आता पाच वर्षे झाली. मात्र, रामटेकेने दाखविलेल्या जागेवर केवळ खड्डेच दिसत आहेत. प्रत्येक वेळी तो वेगळे कारण सांगून फ्लॅट बुक करणारांना आल्यापावली परत पाठवित होता. मात्र, त्याची बनवाबनवी उघड झाल्यामुळे अनेक जण एकत्र आले. त्यांनी पोलिसांना रामटेकेच्या फसवणुकीची माहिती दिली. चौकशीच्या नावाखाली अनेक दिवस पोलिसांनी त्यांना टोलविले. परंतु, शनिवारी नागरिकांनी धंतोली ठाण्यासमोर गर्दी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. ठाणेदार राजन माने यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावतीने कैलास पाटील यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. सुचित रामटेके, सुधाकर सोनपिंपळे, अमित राव, विजय वर्मा, गुणवंत गिरडकर, संजय चहांदे, अविनाश बारसागडे, महेश बावणे, शिल्पा इंगळे, राजेंद्र भागवत, सुमित अग्रवाल, अपेक्षा मेश्राम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)