आज मोहम्मद कैफ याचा वाढदिवस
----------------------
भारताच्या क्षेत्ररक्षणाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मोहम्मद कैफचा जन्म १ डिसेंबर १९८० रोजी अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे झाला.
--------------------------
- २००० सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारताचे नेतृत्व.
- २००४ साली बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मालिकावीर.
- वयाच्या २०व्या वर्षी भारताच्या कसोटी संघात मिळवले स्थान.
- विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम. २००३ साली श्रीलंकेविरुद्ध ४ झेल घेतले.
- आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांकडून खेळला.
- आयपीएलमध्ये २०१७ साली गुजरात लायन्स संघाचे, तर २०१९ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहायक प्रशिक्षकपद.
-----------------------------
लक्षवेधी कामगिरी :
२००२ साली लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या नेटवेस्ट सिरिजच्या अंतिम सामन्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ७५ चेंडूंत नाबाद ८७ धावा फटकावत कैफने भारताला हातातून गेलेला सामना जिंकवून दिला होता.
-------------------------
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाकडे वळालेल्या मोहम्मद कैफने २०१४ सालची लोकसभा निवडणूक फुलपूर (यूपी) येथे काँग्रेसकडून लढवली. मात्र त्याचा पराभव झाला.
---------------------------