शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांसाठी झोननिहाय ऑपरेशन सेंटर निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:26 IST

शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.

ठळक मुद्देनागपूर मनपा वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावा घेण्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात झोननिहाय ऑपरेशन सेंटरची निर्मिती करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये सभापती मनोज चापले यांच्यासह समितीचे सदस्य प्रमोद कौरती, लखन येरवार, दिनेश यादव, सदस्या विशाखा बांते, वंदना चांदेकर, उपायुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. विजय जोशी, पीसीआयचे डॉ. प्रवीण कुमार यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.शहरात जवळपास ७५ हजारावर मोकाट कुत्र्यांची संख्या आहे. कुत्र्यांच्या चावा घेण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हैदोषामुळे नागरिकांमध्येही प्रचंड रोष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडताही येत नाही व त्यांना मारताही येत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेउन नागरिकांची सुरक्षा राखली जावी. मनपाच्या दहाही झोनमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीसाठी प्रत्येकी एका ऑपरेशन सेंटर निर्माण करण्यात यावे, असे निर्देश चापले यांनी यावेळी दिले.यंदा डेंग्यूच्या विळख्याने शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र पुढील वर्षी ही परिस्थिती ओढवू नये यासाठी मनपाने आधीपासूनच तयारीत असणे आवश्यक आहे. डेंग्यू डासांमुळे होत असल्याने आधी डासांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. मागील महिन्यात गांधीबाग झोनमधील मेयो रुग्णालय परिसरात सनराईज एंजीटेक प्रा.लि. कंपनीच्या डास पकडण्याच्या मशीनची चाचणी करण्यात आली. यामध्ये डासांच्या घनतेच्या अनुषंगाने १० टक्क्यापर्यंत डास मशीनद्वारे पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शहरातील नागरिकांची डेंग्यूपासून सुरक्षा करण्याच्या दृष्टीने ही अत्याधुनिक मशीन खरेदी करून डासांची जास्त समस्या असलेल्या ठिकाणी लावण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.हत्तीरोगाच्या औषधासाठी जनजागृती करायावेळी पीसीआयचे डॉ. प्रवीण कुमार यांनी हत्तीरोग होण्याची कारणे, त्यावरील औषधोपचार यांची माहिती दिली. शासनाने हत्तीरोगावर प्रतिबंधात्मक आय.डी.ए. (आईवरमेक्टिन, डाईएथाइलकाबार्मॅजीन सायट्रेट, अल्बेडॉझाल) या तीन औषधांचा सात गोळ्यांचा डोज निर्धारित केला आहे. हत्तीरोगाला संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी हा डोज प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. मात्र यासाठी योग्य जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक त्या माध्यमांचा उपयोग व घरोघरी जाऊन औषध वितरीत करणाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या मार्फत जनजागृती करण्याचे निर्देश चापले यांनी दिले.

 

 

टॅग्स :dogकुत्राNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका