शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

‘भारत बंद’साठी रणनीती तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:23 IST

राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. याबाबत शहर काँग्रेसने शनिवारी बैठक घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर बंद यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार शहरातील चौकाचौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसने घेतली बैठक : चौकाचौकात होणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. याबाबत शहर काँग्रेसने शनिवारी बैठक घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर बंद यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार शहरातील चौकाचौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सचिव उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकाळात कच्च्या तेलाच्या किमती अधिक होत्या. यानंतरही आजच्या तुलनेत पेट्रोल-डिझेले मूल्य ४० टक्के कमी होते. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बेहाल झाले आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत तरीही केंद्रातील मोदी सरकार याचा लाभ लोकांपर्यंत न पोहोचविता त्यांच्यावर टॅक्स भार लादत आहे. नागरिकांचे बजेट बिघडले आहे. तेव्हा या बैठकीत शहरातील सर्व ६ विधानसभा क्षेत्रातील १८ ब्लॉक अध्यक्षांमार्फत शहरात विविध चौकांमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. बैठकीत प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, जयंत लुटे, रमण पैगवार, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे, नितीश ग्वालवंशी, दर्शनी धवड, माजी आमदार यशवंत बाजीराव, राजेश नंदनकर, शिल्पा बोडखे, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, दयाल जशनानी, नरेश सिरमवार, अरविंद वानखेडे, मंगेश कामुने, अब्दुल शकील, सुनील दहीकर, फिरोज खान, मालिनी खोब्रागडे, प्रवीण आगरे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, बॉबी दहीवले, धरम पाटील, रामगोविंद खोब्रागडे, वासुदेव ढोके, योगेश देवतळे, राजेश कुंभलकर, चंद्रकांत हिंगे, प्रसन्ना जिचकार, इरशाद अली, मोंटी गंडेचा, रवी गाडगे पाटील आदी उपस्थित होते.इतर पक्षांचाही मिळाला पाठिंबाकाँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला समाजवादी पार्टीने समर्थन दिले आहे. पक्षाचे विदर्भ प्रमुख अफजल फारुक यांनी सांगितले आहे की, देशातील नागरिक दरवाढीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे पक्ष या बंदचे समर्थन करते. पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करतील.

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Bandhभारत बंद