शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहांत तृतीयपंथींसाठी स्वतंत्र बराक तयार करा; राज्य सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 20:53 IST

Nagpur News राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार केले जावे, यासाठी नागपूर येथील तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देउत्तमबाबाची याचिका

नागपूर : राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार केले जावे, यासाठी नागपूर येथील तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून यावर येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तमबाबा हा तृतीयपंथी चमचम गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. ही घटना जून-२०१९ मध्ये घडली होती. त्यानंतर उत्तमबाबाला सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुरुष कैदी शारीरिक-मानसिक छळ व लैंगिक अत्याचार करतात, असा खळबळजनक आरोप उत्तमबाबाने केला होता. त्यामुळे त्याला १७ जून २०२१ रोजी अकोला जिल्हा कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. परंतु, तेथेही त्याला पुरुष कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे. ते कैदीसुद्धा छळतात, असे उत्तमबाबाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्वतंत्र बराकीवर निर्णय होईपर्यंत महिला कैद्यांच्या सेलमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणीदेखील त्याने केली आहे. उत्तमबाबातर्फे ॲड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.

टॅग्स :jailतुरुंगTransgenderट्रान्सजेंडर