शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’करिता नवे नियम व कायदे तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:32 IST

कोरोना महामारीच्या काळात नव्याने विकसित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे भविष्यात उत्पादकता आणि कुशलता वाढणार आहे. या कार्यपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून याकरिता नवीन नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्दे‘कॅट’ची पंतप्रधानांकडे मागणी : कोरोनात नवीन कार्यपद्धती उदयास, उत्पादकता आणि कुशलता वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीच्या काळात नव्याने विकसित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे भविष्यात उत्पादकता आणि कुशलता वाढणार आहे. या कार्यपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून याकरिता नवीन नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.या कार्यपद्धतीत भविष्यात कर्मचारी आणि मालकांमध्ये वाद वाढणार आहेत. त्यात निवाडा आणि प्रणाली सक्षम बनविण्यासाठी मजबूत नियम व कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. लोकमतशी चर्चेदरम्यान ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारत आणि जगात एका नवीन कार्यप्रणालीला जन्म दिला आहे. वेळ आणि परिस्थिती पाहून स्वत:च अस्तित्वात आली असून विपत्रीत परिस्थितीत काम करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल ठरले आहे. कॉर्पोरेट, उद्योग आणि छोट्या व्यवसायाशी जुळलेल्या क्षेत्रानेही या प्रणालीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून अवलंब केला आहे. यामध्ये अनेक लाभांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक कमी करण्याची क्षमता आहे. कोरोनानंतरही हे मॉडेल सुरूच राहणार असून पुढे गतिशील बनणार आहे. नव्यानेच जन्म झालेल्या या प्रणालीसाठी नियम वा कायदे नाहीत. पंतप्रधानांनी सर्व पैलूंचा विचार करून वर्क फ्रॉम होम वर्किंग मॉडेलकरिता एक विस्तृत व व्यापक नियम आणि कायदे तयार करावेत.भरतीया म्हणाले, कोणत्याही कंपनीचा १७ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर होतो. वर्क फ्रॉम होम संकल्पनेत कंपन्यांच्या या खर्चात १२ टक्के बचत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कमी होऊन रस्त्यावरील भार कमी होण्यासह प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतरही वर्क फ्रॉम होम मॉडेल राज्य व केंद्र शासन, बँकिंग क्षेत्र, व्यापार, उद्योग, आरोग्य सेवा, शैक्षणिक क्षेत्र, मीडिया, मनोरंजन, विमा, वित्तीय सेवा आणि विभिन्न अन्य क्षेत्रात यशस्वीरित्या सुरू राहणार आहे. याशिवाय वैयक्तिक चर्चा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलन, संस्थांचे एजीएम, राजकीय रॅली आदींसह अन्य कार्यक्रमही व्हर्च्युअल सुरू आहेत. हे मॉडेलचा अवलंब वेगाने होत असून यशस्वी प्रयोग असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय