शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या ई-तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांना दणका

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2024 21:04 IST

आरपीएफकडून १३ दलाल जेरबंद : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याची संधी साधून अवैध मार्गाने ई तिकिट मिळवणाऱ्या आणि नंतर त्याची काळाबाजारी करून प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या दलालांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणच्या १३ दलालांना दणका देऊन त्यांच्याकडून जुन्या-नव्या रेल्वे तिकिट, आणि ईतर साहित्य असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांची गर्दी सारखी वाढतच आहे. त्यामुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित तिकिट मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे दलाल आपले जुगाड करून अवैध मार्गाने ई तिकिटा मिळवून त्याची काळाबाजारी करीत आहेत. रेल्वेच्या खिडकीवर किंवा संकेतस्थळावर आरक्षित तिकिट मिळत नाही. मात्र,दलालांकडे गेल्यास सहज आरक्षित तिकिट मिळते. एका तिकिटावर दलाल प्रवाशांकडून ३०० ते ७०० रुपये जास्त घेतात, अशी स्थिती असल्याने रेल्वे प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या ध्यानात घेता आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरक्षित तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दलालांविरुद्ध विशेष कारवाईची मोहिम राबविण्याचे आदेश आपल्या ठिकठिकाणच्या पथकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, १ मे ते १३ मे २०२४ या कालावधीत १३ दलालांकडे छापे टाकून त्यांना अटक करण्यातर आली. त्यांच्याकडून १८३०४ रुपयांच्या ८ नवीन तर, २ लाख, ३ हजारांच्या १५९ तिकिट जप्त करण्यात आल्या. या तिकिटा मिळवण्यासाठी दलालांनी वापरण्यात आलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल तसेच अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलालआरपीएफने स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलाल पुढील प्रमाणे आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, ईतवारी रेल्वे स्थानक नागपूर २ दलाल, मोतीबाग नागपूर १, भंडारा २, गोंदिया १, डोंगरगड १, नैनपूर ३ आणि छिंदवाडा ३ दलाल. प्रवाशांनी दलालांकडे जाऊ नयेप्रवासी दलालांकडून तिकिटा घेतात म्हणून ते काळाबाजारी करतात. प्रवासी दलालांकडे गेलेच नाही तर दलाल तिकिटांची काळाबाजारी करणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी दलालांकडे जाण्याऐवजी रेल्वे काउंटर किंवा संकेतस्थळावरून तिकिटा घ्याव्या, असे आवाहन सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर