शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक झोनमध्ये फिरते कोविड चाचणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:05 IST

नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ बसेस सज्ज : आपली बसमध्ये केले परिवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोविड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या आपली बसच्या ढाच्यामध्ये किरकोळ परिवर्तन करून त्या बसेस फिरते कोविड चाचणी केंद्र म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. अशा १२ बसेस सध्या सज्ज झाल्या आहेत.महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखवून या बसला रवाना केले. अनेक लोक काही आजार, वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने चाचणी केंद्रावर चाचणीसाठी जाऊ शकत नाही अशांसाठी या कोविड चाचणी बसेस फायदेशीर ठरणार आहेत. शहरातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची लक्षणे लपवू नयेत, त्यांची वेळीच चाचणी होऊन उपचार सुरू व्हावेत यादृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून त्यात एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्याची त्वरित चाचणी करण्यास या बसेस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक बस उपलब्ध असून स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने चाचणी केली जाईल. शहर बसचा उपयोग कोविड चाचणी केंद्रासाठी करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.मनपाकडे आधी दोन फिरते चाचणी केंद्र होते. आता परिवहन विभागाच्या सहकार्याने यामध्ये १२ केंद्रांची भर पडली आहे.बसमधून एकावेळी दोघांची चाचणीआपली बसमध्ये परिवर्तन करून तयार करण्यात आलेल्या कोविड चाचणी केंद्रामधून एकावेळी दोन जणांची चाचणी केली जाणार आहे. यासाठी बसमध्ये दोन डॉक्टर, एक नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसमध्ये मुख्यत: आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या