शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोविडचा डोळ्यातूनही संसर्ग; विशेष काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 13:05 IST

corona virus, Nagpur news कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोविडचे एक लक्षण आहे.

ठळक मुद्देडॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोविडचे एक लक्षण आहे. याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला नेत्र शल्यचिकित्सक तथा ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि नेत्रतज्ज्ज्ञ तथा नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ. विरल शाह यांनी दिला. मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोविड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी त्यांनी कोविड आणि डोळ्यांची निगा या विषयावर मार्गदर्शन केले.

डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणाऱ्या संसर्गाएवढाच घातक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा. कोविड संकटात शक्य असल्यास कॉन्टॅक्ट लेन्स टाळा आणि चष्मा वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा, असे आवाहन यावेळी राफत खान आणि विरल शाह यांनी केले.२०-२०-२० चे सूत्र अंगीकाराएकटक मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहत असल्याने डोळ्यांमध्ये ओलावा ठेवणारा अश्रूंचा थर कमीकमी होत जातो. त्यामुळे अनेक त्रास सुरू होतात. यावर उपाय म्हणून २०-२०-२० चे सूत्र अंगीकारा. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहत असताना किंवा त्यावर काम करत असताना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घ्या, या ब्रेकमध्ये किमान २० मीटर दूरपर्यंत पाहा, आकाश, झाडे, खिडकीबाहेरचा परिसर पाहा, पापण्यांची उघडझाप करा, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस