शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोलमडली वाहतूक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:21 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते.

ठळक मुद्देमुख्य मार्ग, चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, जाममध्ये अडकले वाहनचालक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसले. शहराच्या अनेक प्रमुख मार्गांवर आणि चौकात वाहतूक पोलीस ड्युटीवर नसल्यामुळे तासन्तास वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते.वाहतूक पोलीस नसल्यामुळे शहरातील अनेक चौकात वाहनचालक एकमेकांवर आदळून त्यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा वाहतुक पोलीस विभागाची कुठेच उपस्थिती आढळली नाही. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे बुधवारी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दृष्टीस पडले. अनेक मार्गावर वाहनचालक जाममध्ये अडकून पडले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी मार्गावर तासन्तास जाम लागला होता. परंतु वाहतुक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हता. याशिवाय कॅनाल रोड, रामदासपेठ, रेल्वेस्टेशन रोड, सीए रोड, रामझुला, कामठी रोड, गड्डीगोदाम, सदर, पुनम चेंबर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर जाम लागला होता.अशी बिघडली व्यवस्थावाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहनचालक आपल्या मर्जीप्रमाणे वाहन चालविताना आढळले. यामुळे चौकाचौकात जाम लागल्याचे दिसले. अनेक मार्गावर तर वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहनचालक डिव्हायडरवरुन जाताना दिसले. यामुळे समस्या आणखीनच वाढली होती.जाममध्ये अडकली रुग्णवाहिकारामदासपेठकडे जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रंथालय मार्गावर तासन्तास जाम लागल्याची स्थिती होती. रुग्णाला घेऊन जाणारी एक रुग्णवाहिकाही या जाममध्ये अडकून पडली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडल्याचे दिसले. या मार्गाच्या समोरील रस्ता मोकळा होता. परंतु वाहतूक वळविण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्यामुळे वाहनचालक जागेवरच अडकून पडले होते.शाळकरी विद्यार्थी झाले त्रस्तकामठी मार्गावर गड्डीगोदामपासून गोळीबार चौकापर्यंत जाम लागल्याची स्थिती होती. या मार्गावरही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस दिसला नाही. या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. अशा स्थितीत रस्ता आधीच अरुंद झाला असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी अडकून पडले होते.सदरकडून वाढली वाहतूकआकाशवाणी चौकाकडून रिझर्व्ह बँक चौकाकडे जाणारा रस्ता बंद होता. त्यामुळे सीताबर्डी आणि सिव्हील लाईन्सकडून येणाऱ्या वाहनचालकांना जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरून सदरकडे जावे लागले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरही जाम लागला होता. सदर परिसरातही वाहतुकीत वाढ झाली होती. सदर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Trafficवाहतूक कोंडी