शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी विभागातील गैरव्यवहारांच्या चौकशीवर न्यायालयाची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:11 IST

राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत.

ठळक मुद्देविशेष समिती नेमली : उच्च व जिल्हा न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विविध विभागांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ््यांच्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे विशेष समिती नेमण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे असूनदेखील त्यात बराच काळ कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, राळेगाव व केळापूर तालुक्यात ‘मनरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या कामांत गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणातील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड.ए.हक यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी याचिका दाखल केली होती. तिन्ही तालुक्यांत मनरेगा योजनेंतर्गत ११९ कोटींची कामे करण्यात आली. कामे यंत्राद्वारे करण्यात आली व मजुरांचे कार्ड दाखवून पैसे उचलण्यात आले. त्यासंदर्भात सरकारकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारी विभागांमधील गैरव्यवहार, त्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करायला हवी, असे मत व्यक्त केले होते. २०१२ पासून सहा वर्षे उलटल्यावरदेखील सरकारकडून कोणतीच कठोर कारवाई करण्यात आली नाही. प्रकरणात गुन्हा दाखल असून आरोपपत्र प्रलंबित आहेत.या अगोदरदेखील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अशा घोटाळयांमध्ये केवळ जनतेच्या पैशाची लूट होते. तसेच चौकशी व कारवाईच्या नावावर केवळ सरकार व न्यायपालिकेचा वेळ जातो. त्यामुळे सरकार व प्रशासनाच्या दबावात न येणारी स्वतंत्र तपास यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे पुन्हा नमूद करून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची समिती नेमली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.महेश धात्रक आणि सरकारतर्फे अ‍ॅड.दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी