शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

न्यायालयांचे कामकाज ठप्प

By admin | Updated: April 1, 2017 02:56 IST

‘अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट-१९६१’मध्ये प्रस्तावित दुरुस्तीविरुद्ध बार कौन्सिल आॅफ इंडियाद्वारे जाहीर संप उपराजधानीत यशस्वी ठरला.

उपराजधानीत वकिलांचा संप : ‘अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट’मध्ये दुरुस्तीस विरोध नागपूर : ‘अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट-१९६१’मध्ये प्रस्तावित दुरुस्तीविरुद्ध बार कौन्सिल आॅफ इंडियाद्वारे जाहीर संप उपराजधानीत यशस्वी ठरला. सर्वच संघटनांच्या वकिलांनी एकतेचे दर्शन घडवून न्यायालयांत काम केले नाही. तातडीने आदेशाची गरज आहे अशा मोजक्याच प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाच्या यादीतील अन्य प्रकरणांवरील सुनावणीस वकील अनुपस्थित राहिले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, जिल्हा व सत्र न्यायालय, कुटुंब न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औद्योगिक व कामगार न्यायालय यासह अन्य न्यायालयांत वकिलांनी मोठ्या संख्येत एकत्र येऊन ‘अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट’मध्ये प्रस्तावित दुरुस्तीस कडाडून विरोध केला. जिल्हा व सत्र न्यायालयांतील वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केलीत. भारतीय विधी आयोगाने वकिलांना संप करण्यास बंदी करण्यात यावी, संपावर जाणाऱ्या वकिलांवर कठोर दंड आकारण्यात यावा व त्यांची सनद निलंबित करण्यात यावी अशा शिफारशी केंद्र शासनास केल्या आहेत. या शिफारशी अमलात आणण्यासाठी ‘अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट-१९६१’मध्ये दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. या शिफारशी घटनाबाह्य, लोकशाहीविरुद्ध व वकिलांच्या अधिकारांचे हनन करणाऱ्या आहेत असे मत वकिलांनी व्यक्त केले. जिल्हा न्यायालयात निदर्शने जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य वकिलांनी अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या नेतृत्वात न्यायमंदिर इमारतीच्या समोर धरणे देऊन निदर्शने केली. यात अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. नीलेश गायधने, अ‍ॅड. श्रीकांत गौळकर, अ‍ॅड. पराग बेझलवार, अ‍ॅड. गिरीश खोरगडे, अ‍ॅड. रायभंडारे, अ‍ॅड. मनोज मेंढे, अ‍ॅड. समीर पराते, अ‍ॅड. चव्हाण, अ‍ॅड. सतपुरे, अ‍ॅड. माटा, अ‍ॅड. चौरसिया, अ‍ॅड. रवी नायडू, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. नंदकिशोर बाजपेयी, अ‍ॅड. अनंत झरगर, अ‍ॅड. राज शेंडे, अ‍ॅड. संकेत यादव, अ‍ॅड. भंडारी यांचा समावेश होता. वकिलांनी सर्व दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातील कामकाजात सहभाग घेतला नाही. वकिलांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अशिलांचे प्रकरण खारीज केल्या जाऊ नये, अशी विनंती जिल्हा बार असोसिएशनने सर्व न्यायाधीशांना केली आहे. संपात सहभागी होऊन सहकार्य बार कौन्सिल आॅफ इंडियाने जाहीर केलेल्या संपाला हायकोर्ट बार असोसिएशनचा पाठिंबा होता. त्यानुसार संघटनेचे सदस्य असलेल्या सर्व वकिलांनी संपात सहभागी होऊन सहकार्य केले. -अ‍ॅड. अरुण पाटील, मावळते अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन. संघर्ष कायम राहील वकिलांना संपाच्या अधिकारापासून वंचित करणे घटनाबाह्य आहे. विधी आयोगाच्या शिफारशी खारीज होतपर्यंत जिल्हा वकील संघटनेचा संघर्ष कायम राहील. -अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अध्यक्ष, जिल्हा वकील संघटना. कौन्सिलसोबत राहणार वकिलांना संपाच्या अधिकारापासून वंचित करण्याच्या शिफारसीविरुद्ध बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतलेली भूमिका योग्य आहे. याप्रकरणात विदर्भ लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशन नेहमीच कौन्सिलसोबत राहील. -अ‍ॅड. कौस्तुभ पाटील, सचिव, विदर्भ लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशन. संप यशस्वी केला बार कौन्सिल आॅफ इंडियाद्वारे जाहीर संप मॅट वकील संघटनेने यशस्वी केला. शुक्रवारी दिवसभर संघटनेच्या एकाही सदस्याने न्यायालयात काम केले नाही. कौन्सिलला संघटनेचा पाठिंबा आहे. -अ‍ॅड. एस. पी. पळसीकर, अध्यक्ष, मॅट वकील संघटना. शिफारशी अवैध भारतीय विधी आयोगाने वकिलांसंदर्भात केलेल्या शिफारशी अवैध आहेत. या शिफारशींचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. शिफारशी लागू होऊ नये यासाठी कौन्सिलच्या आदेशानुसार आंदोलन करीत राहणार. -अ‍ॅड. तेजस्विनी खाडे, अध्यक्ष, कुटुंब न्यायालय वकील संघटना.