शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेमिनरी हिल्समधील क्वॉर्टर्समध्ये दांपत्य आढळले मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय

By योगेश पांडे | Updated: June 19, 2024 23:24 IST

घटनास्थळावर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्र सरकारी क्वॉर्टर्समधील दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज लावण्यात येत असला तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

दीपक गजभिये (५६) व विद्या गजभिये (५३) अशी मृतक पती-पत्नीची नावे आहेत. दीपक एअरफोर्समध्ये ड प्रवर्गातील कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तर विद्या या गृहिणी होत्या. हे दांपत्य मुळचे कामठीतील बुद्धनगर, जयभीम चौक येथील निवासी होते. मात्र १६ वर्षांपासून ते कामानिमित्त नागपुरात राहत होते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. या घटनेच्या वेळी त्यांचे मुलगा व मुलगी कामठीला कामाने गेले होते. दुपारी ते परतल्यावर दरवाजा उघडला असता दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तर विद्या निपचित पडल्या होत्या. त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घटनास्थळावर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकेल असे गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांनी सांगितले. या घटनेमुळे गजभिये यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी