शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

देशातला पहिला ‘प्री-कास्ट’ आर्क ब्रिज नागपूरच्या गोरेवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 23:21 IST

इंडियन रोड काँग्रेसच्या तांत्रिक प्रदर्शनात रस्ते बांधणासंदर्भातील नवनवीन संशोधन पहायला मिळतात. असेच एक संशाधन म्हणजे ‘आर्क ब्रिज’च्या स्टॉलला भेट दिल्यावर समजून येते. इंग्रजांच्या काळातील ‘आर्क ब्रिज’हे मुख्य आकर्षण होते. परंतु नंतर तसे पूल बनणे बंदच झाले. मात्र मॉडर्न आर्कने पुन्हा तसे पूल बनवायल सुरुवात केली आहे. या पुलासाठी स्टीलचा वापर होत नाही. ते पूर्णपणे काँक्रिट ब्लॉकने तयार होतात. एका जागी त्याचे ठोकळे तयार करून पुलाच्या ठिकाणी आणून ते जोडले जातात. या नवीन तंत्रज्ञानाने हे पूल स्वस्त आणि दुप्पट टिकावू आहेत. या पद्धतीने देशातील पहिला ‘आर्क ब्रिज’ हा आपल्या नागपुरातच गोरेवाडा येथे तयार करण्यात आला आहे, असा दावा सूरज पांडे यांनी केला.

ठळक मुद्देसूरज पांडे यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन रोड काँग्रेसच्या तांत्रिक प्रदर्शनात रस्ते बांधणासंदर्भातील नवनवीन संशोधन पहायला मिळतात. असेच एक संशाधन म्हणजे ‘आर्क ब्रिज’च्या स्टॉलला भेट दिल्यावर समजून येते. इंग्रजांच्या काळातील ‘आर्क ब्रिज’हे मुख्य आकर्षण होते. परंतु नंतर तसे पूल बनणे बंदच झाले. मात्र मॉडर्न आर्कने पुन्हा तसे पूल बनवायल सुरुवात केली आहे. या पुलासाठी स्टीलचा वापर होत नाही. ते पूर्णपणे काँक्रिट ब्लॉकने तयार होतात. एका जागी त्याचे ठोकळे तयार करून पुलाच्या ठिकाणी आणून ते जोडले जातात. या नवीन तंत्रज्ञानाने हे पूल स्वस्त आणि दुप्पट टिकावू आहेत. या पद्धतीने देशातील पहिला ‘आर्क ब्रिज’ हा आपल्या नागपुरातच गोरेवाडा येथे तयार करण्यात आला आहे, असा दावा सूरज पांडे यांनी केला.या पद्धतीने बनवण्यात आलेले पूल हे इतरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. तसेच टिकाऊ आहेत. युद्धाचा रणगाडाही या पुलावरून सहजपणे जाऊ शकतो, इतके ते मजबूत आहेत. सतारा आणि अमरावती येथेही हे पूल बनवण्यात आले आहेत.रस्त्यांची गुणवत्ता वाढवणारे ‘मॉडिफाईड बिटूमेन’रस्ते हे अधिक मजबूत आणि वर्षानुवर्षे टिकून राहावेत. ते सहजासहजी खराब होऊ नयेत, त्याची दुरुस्ती करतानाही त्यांची उंची वाढू नये, यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान म्हणजे मॉडिफाईड बिटूमेन. ऊम्स पॉलिमर मॉडिफाईड बिटूमेनच्या स्टॉलवर गेल्यास देशातील सर्व महत्त्वाचे रस्ते, विमानतळांवर याचाच वापर केला जात असल्याचे दिसून येईल. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव कथल यांनी सांगितले की, मॉडिफाईड बिटूमेन ही एक विशिष्ट पद्धत असून त्याचा वापर केल्यास रस्त्याचे जीवनमान वाढते. त्यांचा दर्जा वाढतो. नागपूरसारख्या शहरात प्रचंड तापमान असते. या तापमानात रस्त्याचे तापमान आणखी वाढते. त्यातून रस्त्यांना भेगा पडतात. सिमेंट रोडवर चालताना घर्षण जास्त होते. अपघाताचा धोका अधिक असतो, अशा रस्त्यांवर याचा वापर झाल्यास सुरक्षितता वाढते.मुंबई येथील बांद्रा सी लिंक, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा येथील फॉर्म्युला रेस कोर्स, डिफेन्सचे विमानतळ आदींसाठी याच पद्धतीचा वापर केला जातो. नागपूरच्या आजूबाजूला असलेल्या रिंग रोडची दुरुस्ती करतानाही ही पद्धत अवलंबिण्यात आली असून त्याचे जीवनमान किमान तीन वर्षे आणखी वाढले असल्याचे कथल यांनी  सांगितले.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय