शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिली बोनमॅरो नोंदणी आरंभापासूनच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 11:23 IST

देशातील पहिल्या बोनमॅरो नोंदणीची सुरुवात दीड वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली. मात्र, सुरुवातीच्या दोन दिवसानंतर नोंदणी बंद झाली ती कायमचीच.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये दीड वर्षांपूर्वी झाले होते उद्घाटनअल्प प्रमाणात दाते उपलब्ध होत असल्याचे रुग्ण धोक्यात

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोनमॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा ‘स्टेमसेल’ दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. परंतु स्टेमसेल जुळणारे अल्प प्रमाणात दाते उपलब्ध होत असल्याने अशा आजारात मृत्यूचे प्रमाण आजही अधिक आहे. यावर उपाय म्हणून देशातील पहिल्या बोनमॅरो नोंदणीची सुरुवात दीड वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली. मात्र, सुरुवातीच्या दोन दिवसानंतर नोंदणी बंद झाली ती कायमचीच.वैद्यकीय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टच्या मदतीने राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक व नागपूर येथे ‘बोनमॅरो रजिस्ट्री’चे उद्घाटन नागपूर येथील मेडिकलमधून सप्टेंबर २०१७ ला झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. उद्घाटनानंतर दोन दिवस नोंदणी केंद्र सुरू होते. ३५० जणांनी नोंदणी केली. परंतु त्यानंतर केंद्र बंद पडले ते कायमचेच.

नागपुरात ‘बोनमॅरो रजिस्ट्री’ महत्त्वाचीरक्ताशी संबंधित गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा यशस्वी उपचार आहे. याची सुरुवात नागपुरातून होणे महत्त्वाचे होते. कारण पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली येथे थॅलेसेमिया व सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ४० हजारावर रुग्ण आहेत. अनुसूचित जाती-जमाती व काही इतर समाजातील दुर्बल घटकांमध्ये या रोगाचे प्रमाण मोठे आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘बोनमॅरो रजिस्ट्री’मुळे दाता उपलब्ध होऊन यासारख्या अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते.

१७ शहरांमध्ये दात्यांची तयार होणार होती यादीपहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, मुंबई, औरगांबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये बोनमॅरो रजिस्ट्री हा प्रकल्प सुरु होणार होता. या शिवाय राज्यातील १७ प्रमुख शहरामधून स्वयंसेवी देणगीदारांचा डाटाबेस तयार करण्यात येणार होते. परंतु तूर्तास सर्वच थंडबस्त्यात पडले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय