शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 20:35 IST

सर्वांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा व जगभरात ‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनिवासस्थानी गणरायाची ‘भक्ती’

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गणपती ही विद्येची देवता आहे. देशभरात सगळीकडे गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. देश समृद्ध, संपन्न व शक्तिशाली बनेल अशीच या पर्वावर गणरायाकडे प्रार्थना आहे. सर्वांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा व जगभरात ‘नॉलेज पॉवर’ म्हणून देशाला मान्यता मिळावी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील त्यांच्या रामनगर येथील ‘भक्ती’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.दरवर्षी गणेशोत्सवाला घरी राहण्याचा गडकरी यांचा प्रयत्न असतो. कुटुंबाची परंपरा जपली गेली पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. सोमवारी सकाळी त्यांचे धाकटे पुत्र सारंग यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना झाली. यावेळी पत्नी कांचन, मोठे पुत्र निखील, सुना, नातवंडे सर्वच उत्साहात दिसून येत होते. विशेष म्हणजे गडकरी यांनी घरातील सर्वसामान्य कर्त्या पुरुषाप्रमाणे यावेळी प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवले. घरी आलेल्या सर्वांची ते अगत्याने विचारपूस करत होते. गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. विद्या व ज्ञान यांच्या माध्यमातूनच अंधारातून विकासरूपी प्रकाशाकडे जाणे शक्य आहे. समाजात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांची वाढ व्हावी व समाज ज्ञानमार्गाकडे जावा हीच प्रार्थना आहे, अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.व्यापातदेखील जपतात परंपराएखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबीयांनादेखील भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र नितीन गडकरी मात्र याला अपवाद आहेत. महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी असतानादेखील आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना ते दिसून येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडकरी यांच्यातील आजोबांचेदेखील दर्शन झाले. आपल्या नातवंडांना गणेशोत्सवाचे महत्त्व, परंपरा याबाबत लहानसहान माहिती देत होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी