शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नागपुरात मतमोजणी, निकालानिमित्त चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 20:46 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे.

ठळक मुद्देकोणतीही स्थिती हाताळण्यास पोलीस सज्जसीआरपीएफ, आरपीएफचे सशस्त्र जवानही तैनातकळमना मतमोजणी केंद्राला पोलिसांचा गराडाबॉम्बशोधक, नाशक पथकांकडून कसून तपासणीदंगा नियंत्रण पथके, वज्र आणि वरुणही सज्जपोलीस आयुक्त, सहआयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी उरल्यामुळे नेते-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांची उत्सुकताही टोकाला पोहचली आहे. विविध राजकीय पक्षांचा उत्साह आणि एकूणच स्थिती लक्षात घेता निकालादरम्यान किंवा निकालानंतर उपराजधानीत कसलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे.मतमोजणी दिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात पोलिसांनी गस्त, नाकेबंदी सुरू केली आहे. कसलीही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेची त्रिस्तरीय व्यवस्था केली आहे. त्यानुसार, कळमना मार्केट मतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा गराडा राहणार आहे. स्ट्राँग रूम ते मतमोजणी केंद्रापर्यंत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनांभोवती सशस्त्र पोलीस राहणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या आत-बाहेर सीआरपीएफ, आरपीएफचे सशस्त्र जवान राहणार आहे. या भागात मंगळवारपासूनच बॉम्बशोधक आणि नाशक पथक वारंवार कसून तपासणी करीत आहे. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी ऐनवेळी धावपळ उडू नये म्हणून चार दंगा नियंत्रण पथके, शीघ्र कृती दलाचे कमांडो, वरुण आणि वज्र ही वाहनेही मतमोजणी केंद्राच्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपासून शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांनी संशयास्पद वाहन आणि व्यक्तींची तपासणी करण्यासाठी नाकेबंदी सुरू केली.वाहतुकीवरही लक्षमतमोजणी दरम्यान, विविध मार्गावर होणाºया कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेत अडसर निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली जात असून, त्यासाठी वाहतूक शाखेचे ८ निरीक्षक, १० सहायक आणि उपनिरीक्षक तसेच १४१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांची निवासस्थाने आणि चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून तो निकाल लागल्याच्या काही तासानंतर पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्तांसह प्रत्येक ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर राहणार आहे. संवेदनशील स्थळे आणि वस्त्यांमध्येही कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी काही गडबड गोंधळ झाला की पाच मिनिटांच्या आत तेथे पोलीस पथके दाखल होतील आणि परिस्थिती हाताळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.आयुक्तांचे आवाहनमतमोजणी दरम्यान आणि निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका निघतील. त्याचा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. मार्गावरसुद्धा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान किंवा निकालानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी नागपूर शहराच्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.असे राहील बंदोबस्ताचे मनुष्यबळपोलीस उपायुक्त - ३सहायक आयुक्त - १०पोलीस निरीक्षक २३सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक -१०७पोलीस कर्मचारी (महिला आणि पुरुष) १७४२

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस