शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्वच्छता शुल्काला नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:13 IST

स्वच्छता कराच्या नावाखाली दर महिन्याला सर्वसामान्य नागरिकांकडून ६० रुपये वसूल केले जात आहे. शुल्क वसुली अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतचीही शुल्क रद्द करण्याची मागणीसभागृहात वसुलीला विरोध करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू असलेली स्वच्छता शुल्काची वसुली अन्यायकारक आहे. मालमत्ताकरात आधीच मलजल कर, सफाई कर, शिक्षण कर, पथकर, प्रकाश कर यासह विविध प्रकारचे कर आकारले जातात. आधीच करवाढीमुळे नागरिक त्रस्त आहे. त्यात स्वच्छता कराच्या नावाखाली दर महिन्याला सर्वसामान्य नागरिकांकडून ६० रुपये वसूल केले जात आहे. शुल्क वसुली अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. सत्तापक्षाच्याही अनेक नगरसेवकांचा या निर्णयाला विरोध आहे.स्वच्छता शुल्क वसुली मागे घ्यावी, यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असून सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दिली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नागपूर शाखेनेही स्वच्छता शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक व ग्राहक पंचायतचा विरोध लक्षात घेता शुल्क वसुलीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.विरोधकांना विश्वासात न घेता निर्णयस्वच्छता शुल्क आकारणी करण्यापूर्वी सत्तापक्षाने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. शुल्क वसुली अन्यायकारक आहे. मालमत्ता करात आधीच सफाई कर वसूल केला जातो. आता पुन्हा स्वच्छता कर द्यावा लागणार आहे. शुल्क वसुली गरीब लोकांवर अन्याय करणारी आहे. शुल्क वसुली मागे न घेतल्यास याविरोधात आंदोलन करू. महापालिके च्या सभागृहातही शुल्क वसुली रद्द करण्याची मागणी करणार आहेतानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिकागरिबांना लुटण्याचा प्रकारशहरातील नागरिकां कडून आधीच सफाई करासह विविध प्रकारचे कर वसूल केले जातात. त्यात पुन्हा महिन्याला ६० रुपये म्हणजेच वर्षाला ७२० रुपये स्वच्छता शुल्क शहरातील सर्व नागरिकांना भरावे लागणार आहे. ही वसुली अन्यायकारक आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्याला ६० रुपये तर झोपडपट्टीत राहणाऱ्यांनाही तितकीच रक्कम द्यावयाची आहे. झोपडपट्टीत आठ आठ दिवस कचरा संकलन करणारी गाडी येत नाही. कचराही फारसा निघत नाही. दुसरीकडे मोठे दवाखाने, हॉटेल्समधून मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. त्यांना महिन्याला १२० रुपये आकारले जाणार आहे. हा गरीब लोकांवर अन्याय आहे. अशा स्वरूपाच्या शुल्क आकारणीला आमचा विरोध आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या