शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्रे सुरु होणार : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:36 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही खरेदी करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग मालकांची बैठक घेऊन कापूस खरेदीबाबत आवश्यक सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी केंद्रे बंद होती. परंतु केंद्र सरकारने १५ एप्रिलपासून कापसाची हमी भावाने पुन्हा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात केंद्रीय कापूस खरेदी निगम (सीसीए), महाराष्ट्राचे सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, खासगी बाजार व थेट पणन खरेदीदार त्यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणार आहे.कापसाची खरेदी करताना जिनिंग प्रेसिंग परिसरात कापूस खरेदी व प्रक्रियेच्या कामकाजासाठी सेवक आणि मजूर यांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्या संदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात यावे. एका दिवशी कमाल २० वाहने किंवा बाजार समितीच्या क्षमतेनुसार येण्याजाण्यासाठी वाहनांना पास देण्यात यावे. हमी भावाने कापसाची खरेदी करणे बंधनकारक असून खासगी व्यापाऱ्यांना कोरोनासंदर्भात दिलेल्या सुधारित नियमानुसार अधिन राहून कापूस खरेदी करण्यात यावी. कापसावरील प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हांतर्गत व जिल्हाबाह्य सरकी - गाठीची वाहतूक करावयाची असल्यास परवानगी आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :cottonकापूसcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर