शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मार्केट सुरू; विविध भागातील गर्दी कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 22:09 IST

घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे.कॉटन मार्केट मागील काही दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी व घाऊक भाजी विक्रेते रिंगरोड व वस्त्यात वाहने उभी करून भाजीपाला विक्री करत होते. भाजीपाला खरेदीसाठी छोट्या विक्रेत्यांसोबतच नागरिक गर्दी करत होते. यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मनपा प्रशासनाने मंगळवारपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणाऱ्या भाजीच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहिल. विशेष म्हणजे, येथे किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसून नागरिकांना त्यांच्या त्यांच्या परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासामार्केट हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा बाजार आहे. येथे शेतकरी व घाऊक व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी आणतात मार्केट सुरू करण्याची त्यांची मागणी होती. मार्केट सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यकमनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्त्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. खरेदीकरिता येणाºया ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहील, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही. एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट