शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कॉटन मार्केट मंगळवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 19:33 IST

घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) मंगळवार, १९ मे पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) मंगळवार, १९ मे पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. नागपूर बाहेरून येणाऱ्या भाजीच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी राहिल. विशेष म्हणजे, येथे किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसून नागरिकांना त्यांच्या -त्यांच्या परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.कॉटन मार्केट हा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वाचा बाजार आहे. येथे व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मार्केट बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत घाऊक विक्रीला मंगळवार पासून दररोज पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत कॉटन मार्केटमधील विविध सेक्टर्समधील प्रत्येक दुकानदाराला आठवडयात एकच दिवस दुकान उघडून व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला वगळता या मार्केटमधील इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू राहतील.अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यकमनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कॉटन मार्केट सुरू ठेवताना काही महत्वाच्या अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार कोरोना विषाणू विषयक शासनाने निर्गमित केलेल्या आदेश व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच मास्क व सॅनिटायजरचा वापर बंधनकारक राहिल. खरेदी करिता येणा-या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील, दुकानदाराला नेमून दिलेली जागा किंवा दुकानातच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल, त्याला अतिरिक्त जागेचा वापर करता येणार नाही. एका दुकानदाराला भाजी विक्रीकरिता एकाच वाहनाची परवानगी राहील व सदर वाहन शहीद मैदान येथील वाहनतळावरच पार्क करावे लागेल. दुकानदारांना व सर्व संबंधितांना आपले वाहन भाजी मार्केटच्या क्षेत्रात नेता येणार नाही. सर्व घाऊक विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागा निर्धारित वेळेतच व्यवसाय करणे बंधनकारक राहिल.

 

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट