शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मार्केट बुधवारपासून पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:56 IST

तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्ब्बल ५० दिवसानंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेले कॉटन मार्केट मनपा अधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांच्याकडून शेतकरी व अडतियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून भाजीबाजार भरणार नाही.

महात्मा फुले बाजार असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मंगळवारी सकाळी नागपूर आणि अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात आणला. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पण मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा निषेध करीत बुधवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मनपा कर्मचाऱ्यांनी शिस्तीच्या नावाखाली शेतकरी आणि अडतियांवर दंडे उगारले आणि दडपशाही केली. मानेवाडा रोडच्या कडेला दररोज जवळपास भाज्यांच्या १०० गाड्या उभ्या राहतात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. हिंमत असेल तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दंडे उगारावेत आणि दडपशाही करावी, असे आव्हान महाजन यांनी दिले.कॉटन मार्केटचे अडतिये दोन बाजारात विभागले आहेत. एकूण २४२ अडतियांपैकी १६० कळमना भाजी बाजारात तर ८२ अडतिये कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करीत आहेत. याची माहिती मनपा अधिकाऱ्यांना असतानाही त्यांनी सरसकट २४२ जणांची यादी तयार करून दरदिवशी ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिली. त्यामुळे एका अडतियाचा व्यवसायाचा क्रमांक सात दिवसानंतर येणार आहे. पहिल्या दिवशी व्यवसाय केलेल्या अडतियाला दुसऱ्या दिवशी उधारी वसुलीसाठी बाजारात येण्यास प्रतिबंध आहे. वेळापत्रकानुसार व्यवसाय करण्याचे त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. शिवाय बाजारात दिसल्यास दंड वसूल करण्यात येणार आहे. मनपा अडतियांकडून त्याच्या गाळ्याचे महिन्याचे भाडे वसूल करते. मग अडतियांवर निर्बंध कशासाठी, असा सवाल असोसिएशनने केला आहे. याच कारणावरून मनपाने १२ जणांवर दंड ठोठावला. अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विठ्ठल भेदे यांच्याकडूनही दंड वसूल केला. कॉटन मार्केटचे अडतिये कळमना बाजारात व्यवसाय करीत असल्याची माहिती मनपाला दिली, पण ते ऐकण्याच्या तयारीत नाहीत. सरसकट २४० अडतियांचे वेळापत्रक तयार केल्याने कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर अडतियांवर अन्याय झाला आहे. कॉटन मार्केटमधील खऱ्यां ८२ अडतियांना दरदिवशी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन आणि सचिव राम महाजन यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट