शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:13 IST

बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडूनदेखील मदतीचा हात देणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, गडकरी, केंद्रीय कृषिमंत्र्यांची बैठकशरद पवारांचा घेतला सल्लाप्रस्तावाला सहकार्य करण्याचे कृषिमंत्र्यांचे आश्वासन

ऑनलाईन लोकमतनागपूर : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडूनदेखील मदतीचा हात देणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावाला सहकार्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.‘बीटी’चे ‘लायसन्स’ देण्यात येत असताना पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा कंपन्यांनी केला होता. त्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. विमा काढलेल्यांनादेखील नुकसानभरपाई मिळेल; सोबतच ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्राकडूनदेखील मदत घेण्यात येईल. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर स्पष्ट केले होते.रविवारी केंद्रीय कृषिमंत्री नागपुरात आले असताना सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही यावेळी राधामोहन सिंह यांनी दिली.यावेळी राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. रामदास तडस, खा. कृपाल तुमाने, खा. संजयकाका पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ.ए.के. सिंग, अतिरिक्त महासंचालक पी. के. चक्रवर्ती, महिकोचे राजेश बारवाले, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. मायी, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ.व्ही.एन.वाघमारे, माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर, पणन विभागाचे उपसचिव के.जी. वळवी, कृषी संचालक एम.एस.घोलप, एस.एल.जाधव, क्रॉपकेअर फेडरेशनचे अध्यक्ष राजूभाई श्रॉफ, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी क्षेत्राचे संशोधक या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी