शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यातच अर्धा पगार होतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:16 IST

विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे.

ठळक मुद्दे३ ते ५ हजारापर्यंत बिल आल्याने सामान्य नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. उत्तर नागपुरातील इंदिरानगरसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मजुरांचा अर्धा पगार तर विजेचे बिल भरण्यातच खर्च होत आहे, तेव्हा त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उत्तर नागपुरातील प्रभाग ५ मधील इंदिरा माता नगरात बहुतांश मजुरी करणारे लोक राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही मंडळी विजेचे बिल पाहून चिंतेत पडले आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बिल आल्याने ते एसएनडीएलच्या कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना बिलमध्ये सूट देण्याऐवजी त्यांच्या वीज मीटरची तपासणी करण्यासाठी २७० रुपये भरण्याचा सल्ला देण्यात आला. सेमिनरी हिल्स येथील एसएनडीएल कार्यालयातही याप्रकारच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, विजेचे बिल मनमानी पद्धतीने पाठविले जात आहे. इंदिरा माता नगर येथील खेमाबाई यादव, राजवंती यादव यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरी इलेक्ट्रिक मीटर लावण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत इतके बिल कधीच आले नाही. परंतु आता हजारो रुपये बिल येत आहेत. मातीगोटे उचलण्याचे काम करून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवतो. तेव्हा इतके बिल कसे भरायचे. येथील लोक सकाळी लवकरच कामासाठी बाहेर पडतात. रात्री येतात.अशावेळी २०० ते ३०० रुपये विजेचे बिल आले तरी पुष्कळ आहे. तेव्हा इतके विजेचे बिल कोणत्या हिशेबाने पाठविण्यात आले आहे, याची चौकशी व्हावी. गडबड करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.स्थानिक रहिवासी झडिराम साहू व मूलचंद साहू यांनी सांगितले की, ंमहिन्याला कसेबसे ८ ते ९ हजार रुपये कमावणाºयांना ३ ते ५ हजार रुपये विजचे बिल पाठविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब पोसायचे कसे? यावेळी आलेले विजेचे बिल तब्बल चौपट कसे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.सध्या जास्त बिल येत असल्यास नागरिकांना मीटर तपासण्याचा सल्ला देणाºया एसएनडीएलला बिलामध्ये करण्यात येत असलेल्या नोंदीचीही चौकशी करण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी तुळशीबाग येथील वीज विभागाच्या कार्यालयासमोर वाढलेले बिल आल्यावर नागरिकांनी विजेच्या बिलांची होळी केली होती. त्यावेळी आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. तरीही विजेचे बिल त्या तुलनेत अधिक येत आहे. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनाही भरमसाट बिल पाठवले जात आहे.

टॅग्स :electricityवीज