शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

मंडपाचा खर्च पाचपट

By admin | Updated: August 18, 2015 03:15 IST

सार्वजनिक जागेवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सव वा अन्य धार्मिक कार्यक्र मासाठी मंडप, स्टेज अथवा गेट उभारावयाचे

नागपूर : सार्वजनिक जागेवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सव वा अन्य धार्मिक कार्यक्र मासाठी मंडप, स्टेज अथवा गेट उभारावयाचे असेल तर सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना आता हात सैल करावा लागणार आहे. मंडप वा गेट उभारण्यासाठी नवीन धोरणानुसार पाच पटीने अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दिशा निर्देशानुसार शहरातील सार्वजनिक जागेवर, रस्त्यावर वा फुटपाथवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सवप्रसंगी अस्थायी स्वरुपाचे मंडप वा स्वागतद्वार इत्यादी उभारण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत परवानगी देण्यासंदर्भातील मनपाच्या सुधारित धोरणाला सदस्यांच्या सूचनासह सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आल्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी केली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.मनपाकडून दोन रुपये प्रतिफूट दराने शुल्क आकारले जात होते. आता ही रक्कम प्रति चौरस फूट १० रुपये करण्यात आली असून सुरक्षा ठेवीच्या रकमेत मोठी वाढ करून पाच हजार करण्यात आली आहे. तसेच अनुमती अर्जासोबत पोलीस वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस, पोलीस आयुक्त आदींच्या अनुमतीचे पत्र सादर करावे लागेल. तसेच मंडपाचा नकाशा जोडावा लागणार आहे. अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, स्ट्रक्चर स्टेबिलिटी प्रमाणपत्र यासह १०० रुपयाच्या स्टॅम्पवर अर्ज करावा लागेल. जाचक अटींची पूर्तता केल्यानंतर मनपाच्या अधिनियमानुसार १५ दिवसासाठी अनुमती दिली जाणार आहे. रहदारीचा रस्ता, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आॅटोरिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड, रुग्णालय व शैक्षणिक संस्था आदींच्या ३० मीटर परिसरात मंडप, गेट वा स्टेज उभारण्याला अनुमती दिली जाणार नाही. मनपा व पोलीस विभागासोबतच पर्यावरण, न्यायालय आदींच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, सार्वजनिक मंडळांना करावे लागणार आहे.(प्रतिनिधी)अनेक परवानग्यांची गरज४मंडपासाठी अनुमती घेताना विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतील. दुसरीक डे अस्थायी मंडप व स्वागतद्वार उभारण्यासाठी अनुमती घेतल्यास मनपा नोटीस न बजावता तात्काळ हटविले जाईल. मंडप व स्वागतद्वार उभारण्यासाठी उत्सवाच्या ३० दिवसापूर्वी झोन कार्यालयाकडे अनुमती अर्ज करावा लागेल. अर्जासोबत पोलीस वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस, पोलीस आयुक्त आदींच्या अनुमतीचे पत्र सादर करावे लागेल. तसेच मंडपाचा नकाशा जोडावा लागणार आहे. तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, स्ट्रक्चर स्टेब्लिटी प्रमाणपत्र यासह १०० रुपयांच्या स्टॅम्पवर अर्ज करावा लागेल. तर तासाला १०० रुपये दंड४मंडप वा गेट उभारण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर मंडप वा गेट काढले नाही तर मंडळांना दर तासाला १०० रुपये दंड द्यावा लागणार आहे. २४ तासापर्यंत दंड आकारला जाईल. त्यानतंरही मंडप हटविला नाही तर संबंधिताच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मंडळावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल.चित्रलेखा भोसले यांना श्रद्धांजली४माजी खासदार चित्रलेखा भोसले यांना सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानिमित्त सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा प्रस्ताव विरोधीपक्षनेते विकास ठाकरे यांनी मांडला. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी याला अनुमोदन दिले. सभागृहाचे कामकाज तहकूब करून २१ आॅगस्टला सभा घेण्यात येईल अशी घोषणा दटके यांनी केली.