शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या रोपवनात भ्रष्टाचार !

By admin | Updated: September 16, 2015 03:29 IST

वन विभागाच्या माध्यमातून दक्षिण-उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथे लागवड करण्यात आलेल्या रोपवनात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप .....

वन कामगार संघटनेचा आरोप : दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील घटना नागपूर : वन विभागाच्या माध्यमातून दक्षिण-उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथे लागवड करण्यात आलेल्या रोपवनात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वन कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सिराज पटेल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यासंबंधी संघटनेतर्फे मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक)टी. एस. के. रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे. त्या तक्रारीनुसार दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील कक्ष क्र. ३६४ मधील १७२ हेक्टर क्षेत्रात रोपवन करण्यात आले आहे.मात्र ही सर्व कामे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु येथे मजुरांना कमी दराने मजुरी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात खड्ड्याचे दर ९ ते १० रुपये असताना मजुरांना केवळ ४ रुपयांप्रमाणे मजुरी देण्यात आली. संपूर्ण रोपवनासाठी एकूण ४ लाख ३० हजार खड्डे खोदायचे होते. त्यासाठी ४१ लाख १९ हजार ४०० रुपयांची मजूरी देणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात मजुरांना केवळ १७ लाख २० हजार रुपयेच देण्यात आले असून, इतर २३ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय मजुरी दर २७९.१३ रू पये असताना प्रत्यक्षात मजुरांना केवळ २०० रुपये देण्यात आले. एवढेच नव्हे, तर सदर रोपवन संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्गंत घेण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक लोक सहभागातून रोपवनाची सर्व कामे होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी छत्तीसगड, मध्य प्रदेश व चिखलदरा येथील मजूर आयात करू न त्यांच्या माध्यमातून कामे पूर्ण केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करू न दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी पटेल यांनी मागणी करू न आंदोलन करण्याचा इशाराही दिला. (प्रतिनिधी)