शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:46 IST

खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करण्याच्या सौद्यात साक्षीदाराकडून लाचेची मागणी करणे कोंढाळीच्या पोलीस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सूचना देताच सापळा रचून दोघांनाही २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्यामागेच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्यामागेच सापळा : २० हजार रुपयांची घेतली लाच

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढाळी : खोटे कागदपत्र तयार करून शेतीची विक्री करण्याच्या सौद्यात साक्षीदाराकडून लाचेची मागणी करणे कोंढाळीच्या पोलीस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सूचना देताच सापळा रचून दोघांनाही २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्यामागेच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड, हेडकॉन्स्टेबल निवृत्ती यावले अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत मुरली गावानजीकच्या भडमुर्गा शिवारातील सर्वे क्र. ६८ अंतर्गत ५.६४ हेक्टर शेतीची प्रदीप सीताराम मसराम व मनोहर पंतुजी ठाकरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बोगस विक्री केली. या विक्री प्रकरणात मनीष शेरकर व किशोर जामळे हे साक्षीदार होते. या बोगस विक्रीची तक्रार झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड व हेडकॉन्स्टेबल निवृत्ती यावले हे दोन्ही साक्षीदारांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवित. या प्रकरणात तुम्हाला अटक करू, अशीही धमकी त्यांना दिली. दरम्यान साक्षीदारांनी कोंढाळीच्या ठाणेदारांना भेटण्याचा प्रयत्न केला असता लाचखोर पोलिसांनी भेट होऊ दिली नाही.सदर प्रकरणात साक्षीदारांचे वकील अ‍ॅड. महेश वाघ हे ९ एप्रिलला कोंढाळी पोलीस ठाण्यात भेटण्यास गेले असता प्रकरण निस्तारण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी त्यांना या दोघांनी केली. त्यातील २० हजार रुपये शुक्रवारी (दि. १३) लाचखोर पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर लाचेचे दुसरे इन्स्टॉलमेंट सोमवारी (दि. १६) देण्याचे ठरले होते.यानुसार अ‍ॅड. वाघ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार भंडारा येथील पथकातील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचला. फिर्यादी वाघ हे २० हजार रुपये घेऊन आले. ते पोलीस उपनिरीक्षक राठोडला भेटले असता त्याने हेडकॉन्स्टेबल यावलेकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस ठाण्यामागे लाचेची रक्कम देत असतानाच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला इशारा केला. त्यावरून पथकाने रंगेहाथ हेडकॉन्स्टेबलला अटक केली. तसेच या प्रकरणाचा सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड यालाही अटक केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस