लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांना शवविच्छेदन गृहापर्यंत नेण्याचा प्रवास स्ट्रेचरवरून व्हायचा. उन्ह, पाऊसात मृतदेह वाहून नेताना अडचणीचे व्हायचे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याबाबत खंत व्यक्त करीत शववाहिका दान करण्याचे आवाहनही केले होते. याची दखल मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी घेतली. त्यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.मेडिकलच्या रेडिओथेरपी विभागात आयोजित छोट्याखानी या लोकार्पण कार्यक्रमात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. दीनकर कुंबलकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, मेट्रन मालती डोंगरे व डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते.
निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:24 IST
मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार
ठळक मुद्देमेडिकलमध्ये शववाहिकेचे लोकार्पण