शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:29 IST

शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तक्रारीसाठी ‘अ‍ॅप’ला पसंती : महासभेत आयुक्तांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.दीड वर्षाने महापालिकेच्या निवडणुका आहेत. आतापासून नागरिकांशी संपर्क साधला तर निवडणूक जिंकता येईल. परंतु ‘अ‍ॅप’मुळे तक्रारी मार्गी लागल्या तर नगरसेवकांचे काम राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने नगरसेवकांनी महासभेत मनपाच्या या अ‍ॅपवर नाराजी व्यक्त केली.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारी निवारणासाठी महापालिका कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागू नये, याकरिता त्यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार सात दिवसात सोडविणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अन्यथा अ‍ॅपच्या सिस्टीमच्या माध्यमातून आपोआप संबंधित अधिकाºयाला तक्रार का सुटली नाही, यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस पाठविली जाते. त्यानंतर ती तक्रार वरिष्ठ अधिकाºयाकडे आपोआप वर्ग होते. दरम्यान, अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी प्रशासन प्राधान्याने घेत त्या सोडवत आहेत. मात्र, अ‍ॅपच्या माध्यमातून सुटणाºया तक्रारींमुळे नागरिकांच्या मनातून नगरसेवकांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी रोष व्यक्त करीत प्रशासनाने हे अ‍ॅप नगरसेवकांचे अस्तित्व संपविण्यासाठी तयार केल्याचा आरोप केला. नगरसेवकांनीही दिलेल्या तक्रारी प्रशासनाकडून सोडविल्या पाहिजेत, परंतु नगरसेवकानी दिलेल्या तक्रारी विचारात घेतला जात नाही. मात्र तक्रार नागरिकांनी अ‍ॅपवर टाकली तर २४ तासात सुटत आहे. प्रशासनाची ही भूमिका योग्य नसून असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचाही आरोप सभेत नगरसेवकांनी केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका