मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:27 PM2020-06-27T22:27:17+5:302020-06-27T22:29:00+5:30

शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.

Corporators harassed due to 'app' of Corporation! | मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची तक्रारीसाठी ‘अ‍ॅप’ला पसंती : महासभेत आयुक्तांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.
दीड वर्षाने महापालिकेच्या निवडणुका आहेत. आतापासून नागरिकांशी संपर्क साधला तर निवडणूक जिंकता येईल. परंतु ‘अ‍ॅप’मुळे तक्रारी मार्गी लागल्या तर नगरसेवकांचे काम राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने नगरसेवकांनी महासभेत मनपाच्या या अ‍ॅपवर नाराजी व्यक्त केली.
तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारी निवारणासाठी महापालिका कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागू नये, याकरिता त्यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार सात दिवसात सोडविणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अन्यथा अ‍ॅपच्या सिस्टीमच्या माध्यमातून आपोआप संबंधित अधिकाºयाला तक्रार का सुटली नाही, यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस पाठविली जाते. त्यानंतर ती तक्रार वरिष्ठ अधिकाºयाकडे आपोआप वर्ग होते. दरम्यान, अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी प्रशासन प्राधान्याने घेत त्या सोडवत आहेत. मात्र, अ‍ॅपच्या माध्यमातून सुटणाºया तक्रारींमुळे नागरिकांच्या मनातून नगरसेवकांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी रोष व्यक्त करीत प्रशासनाने हे अ‍ॅप नगरसेवकांचे अस्तित्व संपविण्यासाठी तयार केल्याचा आरोप केला. नगरसेवकांनीही दिलेल्या तक्रारी प्रशासनाकडून सोडविल्या पाहिजेत, परंतु नगरसेवकानी दिलेल्या तक्रारी विचारात घेतला जात नाही. मात्र तक्रार नागरिकांनी अ‍ॅपवर टाकली तर २४ तासात सुटत आहे. प्रशासनाची ही भूमिका योग्य नसून असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचाही आरोप सभेत नगरसेवकांनी केला.

Web Title: Corporators harassed due to 'app' of Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.