शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक तिवारींच्या घरावर हल्ला

By admin | Updated: July 2, 2016 03:06 IST

काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू ऊर्फ योेगेश तिवारी यांच्या घरावर कुख्यात गुंड आशिष ऊर्फ टकल्या फ्रान्सिस याने आपल्या ४ ते ५ सशस्त्र साथीदारांसह शुक्रवारी सकाळी हल्ला चढवला.

इमामवाड्यात तणाव : कुख्यात टकल्या फ्रान्सिस आणि साथीदार फरार नागपूर : काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू ऊर्फ योेगेश तिवारी यांच्या घरावर कुख्यात गुंड आशिष ऊर्फ टकल्या फ्रान्सिस याने आपल्या ४ ते ५ सशस्त्र साथीदारांसह शुक्रवारी सकाळी हल्ला चढवला. प्रसंगावधान राखत तिवारी यांनी घरातून बाहेर निघण्याचे टाळल्याने ते बचावले. उंटखाना (इमामवाडा) प्रभागाचे काँग्रेसचे नगरसेवक असलेले तिवारी आज सकाळी ११.३० च्या सुमारास आपल्या घरी जेवण करीत होते. खालच्या माळ्यावर त्यांचे मोठे बंधू शैलेष तिवारी आणि अन्य नातेवाईक होते. अचानक कुख्यात टकल्या फ्रान्सीस शिवीगाळ करीत तिवारी यांच्या घरावर चालून आला. तिवारी यांच्या कथनानुसार, त्याच्या हातात माऊजर होते. अन्य एकाजवळ पिस्तूल तर, अन्य तीन ते चार जणांजवळ सब्बल आणि तलवार होती. त्यांनी गुड्डू यांना उद्देशून शिवीगाळ केल्याने शैलेष तिवारींनी त्यांना गेटजवळ अडवले. बराच वेळ आरोपी शिवीगाळ करीत होते. तेवढ्यात तेथे एक स्कूल आॅटो आला. एका हल्लेखोराने आॅटोवर तलवार मारल्याने आॅटोची काच तडकली. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी गोळा झाल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. हल्लेखोरांनी हवेत गोळी झाडल्याचेही वृत्त पसरले. त्यानंतर गुड्डु तिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह इमामवाडा पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तेथे टकल्या फ्रान्सिसविरुद्ध तक्रार नोंदवली.खंडणीतून झाला हल्ला नगरसेवक तिवारी बचावले खतरनाक टकल्या मोकाटटकल्या फ्रान्सिस एक खतरनाक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. इमामवाडा पोलीस ठाण्यात काही जणांसोबत त्याचे मधूर संबंध असल्याने तो बिनधास्त या भागात फिरतो आणि खंडणी वसूल करतानाच गुन्हेही करतो. त्याच्यावर २००७ ते २०१६ या कालावधीत एकूण एक डझनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी नगरसेवक गुड्डू तिवारी यांचे बंधू शैलेश तिवारी यांच्या तक्रारीवरून आरोपी आशिष रॉबर्ट उर्फ टकल्या फ्रान्सिस, मारोती दुधमोगरे, सोनू बोंद्रे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती. बाहेर तणाव, ठाणेदार कॅबिनमध्ये या घटनेमुळे इमामवाडा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत जमाव ठाण्यात पोहचला. काही जण चिथावणीची भाषा वापरत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काही पोलीस कर्मचारी जमावाला शांत करीत होते. मात्र, ठाण्यासमोर मोठा जमाव असताना ठाणेदार आपल्या कक्षात बसून होते. तत्पूर्वी ठाणेदार शेखर तावडे आणि सहायक निरीक्षक मोहन अतुलकर यांनी काही कॅमेरामन आणि पत्रकारांशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार आहे. गुंडांपुढे नांगी टाकणारे इमामवाडा पोलीस पत्रकार, छायाचित्रकारांशी अरेरावीने वागत असल्याचे पाहूनही जमावाच्या भावना काही वेळेसाठी तीव्र झाल्या होत्या. काही पत्रकारांनीच जमावाला शांत केले. सहायक आयुक्त रवींद्र कापगते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)