शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने माईक भिरकावला; अजेंडा फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 19:34 IST

विकास निधी वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन व सत्तापक्षाला धारेवर धरले. उपस्थित केलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुणेकर यांनी रागाच्या भरात हातातील माईक भिरकावला.

ठळक मुद्देनिधी वाटपात भेदभाव सभागृहात नगरसेवकांचा आरोप

आॅनलाईन लोकमतनागपूर : विकास निधी वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन व सत्तापक्षाला धारेवर धरले. उपस्थित केलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुणेकर यांनी रागाच्या भरात हातातील माईक भिरकावला. तसेच अजेंडा फेकून सभागृहाबाहेर निघून केले. काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र इतर कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही.प्रश्नोत्तराच्या तासात पुणेकर यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. स्थायी समिती नगरसेवक बघून निधी वाटप करते. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांच्या फाईलला मंजुरी मिळत नाही. लोकांनी निवडून दिले आहे, त्यांच्या समस्या सोडविण्याची नगरसेवकांची जबाबदारी आहे. यासाठी निधीचे समान वितरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे निधी वाटपातील मनमानी विरोधात बोलण्यासाठी उभे झाले. मात्र त्यांना गप्प करण्यात आले. निधी वाटपाच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी शहर कार्यकारी अभियंता मनोज तालेवार आले. यावर पुणेकर यांनी आक्षेप घेत शहर अभियंत्यांचा निधी वाटपाशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित केला. जबाबदार अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगावे. नाहीतर महापालिकेचा चपराशी वा कोणताही कर्मचारी उत्तर देईल, असे त्यांनी निदर्शनास आणले.

दटके, जोशीची मंजुरी आणा !विकास कामांच्या मंजूर फाईल स्वाक्षरीसाठी अपर आयुक्त रिजवान सिद्दीकी यांच्याकडे जातात. परंतु ते फाईलवर स्वाक्षरी न करता यासाठी प्रवीण दटके , संदीप जोशी यांचे मंजुरीपत्र आणण्याचा सल्ला देतात. सत्तापक्षाची सहमती असेल तरच निधी वाटप होणार का?, त्यांनी सहमती दिल्यावर निधी कसा उपलब्ध होतो. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या प्रभागात १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र प्रभाग क्रमांक २० मध्येसुद्धा नागरिकांच्या समस्या असल्याची भूमिका पुणेकर यांनी मांडली.

टॅग्स :Politicsराजकारण